बोलठाण च्या वाघोबा यात्रेस सुरुवात, शेतमालास भाव नसल्याने यात्रेवर पडसाद उमटण्याचे चिन्ह

 Bay- team aavaj marathi 

नांदगाव तालुक्यातील घाटमाथ्यावरील बोलठाण येथील सालाबादप्रमाणे यंदाही श्री दत्त जयंतीचे औचित्य साधून गुरुवार दि.४ डिसेंबर रोजी वार्षिक यात्रेस सुरुवात झाली येथील यात्रोत्सवास वाघोबा ची यात्रा नावाने ओळखले जाते. यावर्षी मोठ्या प्रमाणात परिसरातील नागरिक उदरनिर्वाह करण्यासाठी बाहेर गावी गेल्याने तसेच चालू वर्षी झालेल्या अतिवृष्टी, तसेच नगदी पीक असलेल्या मका, उन्हाळ कांदा, लाल कांदा इत्यादी पिकांना भाव मिळत नसल्याने शेतकरी बांधव चिंतातूर दिसत असल्याने यात्रा उत्सवावर मोठ्या प्रमाणात पडसाद उमटण्याचे चिन्ह दिसत असल्याचे बोलले जात आहे.

हा यात्रा उत्सव पंचक्रोशीतील सर्वात मोठा यात्रा उत्सव म्हणून प्रसिद्ध आहे, खवय्यांसाठी मोठमोठे हॉटेल, भांड्यांची दुकाने, महिलांसाठी विविध प्रकारचे सौंदर्य प्रसाधनांचे दुकाने, खेळणी ची दुकाने, गगनाला भिडणारी पाळणे, चप्पल चे दुकाने, कापडाची दुकाने, यासह विविध प्रकारचे व्यवसाय करणारे येथे आलेले असतात. मध्य महाराष्ट्र , खानदेश, मराठवाड्यातील सर्वात मोठा आणि हिंस्र प्राण्याच्या नावाने कदाचित महाराष्ट्र ही एकमेव यात्रा आहे. या यात्रेस वाघोबा ची यात्रा या नावाने ओळखले जाते, हा यात्रोत्सव हिंदू व मुस्लिम बांधवांचे एकात्मतेचे प्रतीक आहे. 

येथील नागरिकांनी श्रमदाणातुन आणि लोकवर्गणीतून वाघोबा चे मंदिराचे बांधकाम केले असुन मंदिरात वाघाची मुर्ती आहे. येथील आणि पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या श्रध्देने मंदिरात जाऊन वाघोबा च्या मुर्ती चे दर्शन घेतात. या मंदिराची देखभाल ट्रस्ट करत असून मंदिर परिसरात असलेले मालकिच्या जागेत व्यापारी संकुलाचे बांधकाम केलेले आहे. त्यातुन मिळाल्या उत्पन्नातुन मंदिराची देखभाल दुरुस्ती करण्यात येते. या यात्रेची सुरुवात बुधवार दि.४ डिसेंबर रोजी दत्त जयंतीनिमित्त वाघोबा महाराज यात्रोत्सवास प्रारंभ झाला आहे.

यानिमित्ताने येथील वाघोबा च्या मुर्ती गावातील प्रमुख मार्गावरून पालखी मध्ये ठेवून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. सालाबादप्रमाणे दुसऱ्या दिवशी श्री दत्तात्रेयांच्या पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. दि.८ सोमवारी जंगीकुस्त्यांची दंगल आयोजित करण्यात आली आहे.

या मध्ये शेजारील छत्रपती संभाजी नगर, जळगाव, नाशिक जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या नामवंत मल्ल सहभाग नोंदवून मोठ्या प्रमाणात बक्षिसे मिळवितात. यात्रा शांतता पुर्ण व आनंदी वातावरणात पार पडण्यासाठी वाघोबा मंदिर ट्रस्ट, दत्त पुर्णांर्ती भजनी मंडळ, व सर्व बोलठाण ग्रामपंचायत सदस्य तसेच यात्रा उत्सव कमिटी अध्यक्ष श्री भगवान जाधव श्री अनिल रिंढे, खजिनदार रवींद्र रिंढे, सरपंच श्री वाल्मीक गायकवाड, श्री अनिल तात्या रिंढे श्री रफीक भाई पठाण चेअरमन प्रल्हाद रिंढे, श्री बंडू भाऊ पवार, श्री किशोर रिंढे, श्री जितेंद्र पाटणी,श्री विष्णू बारवकर, श्री अन्सार भाई मन्यार, श्री विजय साळवे, श्री गणेश व्यवहारे, श्री नवले सर श्री शिवदास पोकळे व सर्व सदस्य ग्रामपंचायत व ट्रस्ट सदस्य सर्व यांनी माहिती दिली.

Post a Comment

0 Comments