Bay- team aavaj marathi
एक अतिशय खळबळजनक घटना समोर आली आहे. ज्या सुनेच्या हत्येच्या आरोपाखाली पती आणि सासरच्या मंडळींवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. तीच महिला चक्क महाराष्ट्रातील पुण्यात सुखरूप असल्याचे आढळून आले आहे. या घटनेमुळे पोलीस प्रशासन आणि फिर्यादींच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.उत्तर प्रदेशातील श्रावस्ती जिल्ह्यातील आहे.
नेमकं प्रकरण काय? मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील श्रावस्ती जिल्ह्याच्या मल्हीपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हे प्रकरण आहे. लक्ष्मणपूर गंगापूर येथील रहिवासी असलेल्या 'दीपा' नावाच्या तरुणीचा विवाह ओरीपुरवा गावातील हंसराज याच्याशी चार वर्षांपूर्वी झाला होता. काही महिन्यांपूर्वी मे २०२५ च्या सुमारास दीपा अचानक सासरहून बेपत्ता झाली.
दीपा बेपत्ता झाल्यानंतर तिच्या माहेरच्यांनी सासरच्या लोकांवर गंभीर आरोप केले. दीपाच्या आईने (मायावती) न्यायालयात धाव घेत दावा केला की, सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी आपल्या मुलीचा छळ करून तिची हत्या केली आहे आणि मृतदेहाची विल्हेवाट लावली आहे. अशी तक्रार दाखल केली.न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल माहेरच्या नातेवाईकांच्या तक्रारीनंतर आणि न्यायालयाच्या आदेशानुसार, स्थानिक पोलिसांनी पती हंसराज, सासरा परमेश्वर आणि सासू यांच्यासह एकूण सहा जणांवर हुंडाबळी आणि हत्येचा गुन्हा दाखल केला होता. पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते, मात्र 'मृतदेह' किंवा कोणताही पुरावा हाती लागत नव्हता.
परंतु तंत्रज्ञानाचा वापर करून पोलिसांनी सत्य आणले समोर


0 Comments