by Aavaj Marathi Team
परंतु अलिकडे मोबाईल, संगणक, टेलिव्हिजनच्या आगमन झाल्याने विशेषतः मोबाईल हा सर्वांचाच जीवनातील अविभाज्य घटक बनला असल्याने विशेष करून ग्रामीण भागातील शाळेला सुट्टी लागल्या नंतर आवडत्या खेळांपैकी एक असलेला विटी-दांडूचा खेळ नामशेष होण्याच्या मार्गावर दिसत आहे.
प्राचिन काळी संगणक किंवा मोबाईल नव्हते, त्यामुळे मुले इकोफ्रेंडली वस्तू वापरून खेळ खेळत असत.
परंतु अलिकडे मोबाईल, संगणक, टेलिव्हिजनच्या आगमन झाल्याने विशेषतः मोबाईल हा सर्वांचाच जीवनातील अविभाज्य घटक बनला असल्याने विशेष करून ग्रामीण भागातील शाळेला सुट्टी लागल्या नंतर आवडत्या खेळांपैकी एक असलेला विटी-दांडूचा खेळ नामशेष होण्याच्या मार्गावर दिसत आहे.
मुलांच्या अंगमेहनतीने व्यायामही होत असे, विटी-दांडू हा मराठी मातीतील पूर्वीपासून खेळला जाणारा एक खेळ आहे, प्रामुख्याने हा खेळ खेडोपाडी खेळला जात असे.
विटीदांडू हा खेळ पारंपरिक असून खूप मजेशीर आहे. यासाठी मोकळे मैदान, विटी-दांडूसाठी दोन-तीन फूट एक दीड इंच व्यासाच्या लिंब, बाभूळ अथवा तत्सम कडक झाडाच्या लाकडाची गरज असते. झाडाच्या फांदीचा कडक लाकडी भाग घेऊन त्यापासून विटी आणि दांडू बनवले जात असे, कुन्हाडीच्या सहाय्याने चार-पाच इंच लाकडाला दोन्ही बाजूने टोकदार करून विटी तयार केली जात असे,जेणेकरून ती जास्त लांब फेकली जावी हा उद्देश असायचा, परंतु मोबाईल मुळे मुलांचे मैदान हिरावले गेले असल्याचे दिसते.
दोन गटांत खेळाला जानारा विटी-दांडू चा खेळ
एका गटाच्या हाती विटी-दांडू असे, तर दुसऱ्या गटाला टोलवलेली विटी पकडण्याचे काम जमिनीवर मोकळ्या जागेत, चौकामध्ये एक छोटा निमुळता खड्डा (बद) खणून त्यावर विटी ठेवायची आणि ती दांडूने टोलवायची व वरच्या वर दांडूने हवेत उडवायची. विटी वरच्या वर उडवण्याचा प्रक्रियेला 'आवक दुबक' असे म्हणतात.
दुसऱ्या गटाने ती टोलवलेली विटी पकडायची.
दुसऱ्या गटाने ती टोलवलेली विटी पकडायची. विटी वरच्या वर झेल घेतल्यास त्यांना विटी टोलवावयाला संधी मिळायची. ही विटी उडवताना समोर उभ्या असलेल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंनी तिचा झेल पकडला तर टोलवणारा बाद होत असे.
विटीचा झेल घेता आला नाही, तर
विटीचा झेल घेता आला नाही, तर मग त्या (गलवर) बद वर दांडू आडवा ठेवायचा. मग प्रतिस्पर्धी खेळाडू त्याला विटीने मारण्याचा प्रयत्न करतात. दांडूला विटी लागली तर खेळाडू बाद. तो बाद झाला नाही तर मग त्याने विटोने गुण मिळवायचे. हा खेळाडू विटी दांडू च्या सहाय्याने मारुन लांब घेऊन जाईल तिथून त्याने केलेल्या तेथुन जमिनीवर दांडूने अंतर मोजुन तसे अंक मिळत असे. हे झाले संघाचे गुण.
साहजिकच या खेळामध्ये मुलांचे आपोआप गणितातील पाढे गुण मोजतांना पाठ होत असे, करण्याचं कौशल्य जास्त असेल, तर गुण जास्त होतात. या खेळात खूप खेळाडू सहभागी होऊ शकतात. हा खेळ वैयक्तिक आणि सांधिक दोन्ही पद्धतीने खेळता येतो. या खेळास सुरुवात करताना दहा-पाच पैशांचे नाणे घेऊन टॉस केला जात असे. त्याला छापा काटा असे म्हणत.
जो छापा काटा जिंकेल त्याला अगोदर संधी मिळत असे. बऱ्याच वेळा विटीच्या प्रहाराने मुलांचे डोके फुटत असे किंवा डोळ्याला इजा होत असे. मात्र, तरीही मुले न घाबरता हा खेळ खेळत असत. आणि पालक देखील मुलांना काही इजा झाली तर वाईट वाटुन घेत नसे हा खेळ मुलांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा व लोकप्रिय असा होता.
मात्र तो काळानुरूप लोप पावला असून, हल्लीची पिढी जेव्हा पण रिकामी वेळ असेल तेव्हा हातात मोबाईल बसते किंवा टेलिव्हिजन समोर बसलेली आढळून येते. त्यामुळे वरील खेळातून अंगमेहनत होणारे मराठी मातीतील खेळापासून अज्ञात झाली असून हा खेळ देखील लुप्त होत चालला आहे.
0 Comments