पंतप्रधान मोदी यांच्या निमीत्य काही मार्गा वरील वाहतूक बदल

 Aavaj marathi team


नाशिक वृत्त सेवा

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शुक्रवारी (ता.१२) नाशिक दौऱ्यावर येत आहेत. या पार्श्वभूमीवर शहरातील बहुतांशी मार्गांवरील वाहतूक वळविण्यात आलेली आहे. सभास्थळी येणार्या  वाहनांची ठिक ठिकानी पार्किंग व्यवस्था करण्यात आलेली आहे. 


आज पंतप्रधान श्री मोदी यांचा नाशिक येथे भरगच्च कार्यक्रम असूनयुवा महोत्सवासह हॉटेल मिरची ते संत श्री जनार्दन स्वामीमहाराज मठ इथपर्यंत सुमारे एक किलोमीटर अंतराचा रोड शो होणार आहे. तसेच तपोवण येथील मोदी मैदाणावर त्यांची सन 2014 नंतर तिसरी जाहिर सभा होणार आहे.

 यानिमीत्याने, काही मार्ग हे वाहतुकीसाठी बंद करण्यात आले असून, त्या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गांवरून वळविल्या संदर्भातील अधिसूचना शहर पोलीस वाहतूक शाखेचे उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी जारी केले आहे.


वाहतुकीसाठी बदल करण्यात आलेले मार्ग 

संतोष टी पॉईंट ते स्वामी नारायण चौकीकडे जाणारा मार्ग, तपोवन चौफुली ते कार्यक्रम स्थळाकडे जाणारा मार्ग, स्वामी नारायण चौक ते कार्यक्रमस्थळाकडे जाणारा मार्ग, काट्या मारुती चौक ते संतोष टी पॉईंटकडे जाणारा मार्ग, अमृतधाम चौफुली ते मिरची सिग्नलकडे जाणारा मार्ग, संत श्री जनार्दन स्वामी मठ पासून टी पॉईंट ते तपोवनकडे जाणारा मार्ग, लक्ष्मी नारायण मंदिर ते तपोवनकडे जाणारा मार्ग, निलगिरी बाग पाट चौफुली ते तपोवनकडे जाणारा मार्ग, बिडी कामगार पाट चौफुली ते निलगिरी बागकडे जाणारा मार्ग,आणि नांदूरनाका ते तपोवनकडे इत्यादी वरील बदल हा शुक्रवारी (ता.१२) पहाटे ६ वाजेपासून सभा संपेपर्यंत राहणार असल्याचे नाशिक पोलिस वाहतूक नियंत्रण कक्षा कडुन कळविण्यात आलेले  आहे. 

वाहतूक नियंत्रण कक्षा कडून नागरिकांना आव्हान

गरज पडल्यास इतरही काही मार्गावरील वाहतूक ठराविक वेळेसाठी बंद अथवा वळविण्यात येवू शकते तरी स्थानिक नागरिकांनी व पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या नियोजित कार्यक्रमासाठी येणार्या सर्वांनी पोलिस प्रशासनास सहकार्य करावे असे कळविण्यात आले आहे. 


Post a Comment

0 Comments