By-Aavaj marathi team
नांदगाव येथील सौ.क.मा.कासलीवाल माध्य.विद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी करण्यात आली
याप्रसंगी मुख्याध्यापक सर्वश्री शरद पवार, विशाल सावंत,मनी चावला,गोरख डफाळ, इ .मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.
त्यानंतर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी 'आम्ही जिजाऊंच्या लेकी' हे गीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
त्याचप्रमाणेआपल्या मनोगतातून राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्याविषयी माहिती दिली व उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.
यामध्ये लावंण्या जगधने, यश आहेर,आऐशा बेग, प्राची शिंदे, तन्वी दळवे ,पल्लवी सातपुते, कीर्ती सोनार, अन्वी पवार, रेहान शेख या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
तसेच विद्यालयातील मुख्याध्यापक शरद पवार यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या कार्याचा परिचय तसेच गोष्टीचा माध्यमातून स्वामी विवेकानंदांच्या विविध गुणांचा परिचय विद्यार्थ्यांना करून दिला.
याप्रसंगी शाळेचे विशाल सावंत, मनी चावला, गोरख डफाळ तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप आहेर यांनी तर जयश्री चोळके यांनी आभार व्यक्त केले.
0 Comments