By-Aavaj marathi team
''नांदगाव तालुक्यातिल जातेगाव येथे जवळपास सहा महिण्यापुर्वी येथील ग्रामपालिकेने पंधरा वित्त आयोगातून कार्यालयाच्या आवारात आणि गावात ठिकठिकानी असे दहा सीसीटीव्ही कॅमेरे बसविले खरे परंतु त्याचा काही महिन्यातच बोजवारा उडाला.,,
याबाबत सविस्तर वृत्त असे की, येथील ग्रामपालीका कार्यालयाच्या आत १, कार्यालयाच्या पाठिमागे १, समोर १, महादेव मंदिरा समोर १, प्राथमिक शाळेच्या आवारात १, छत्रपती शिवाजी महाराज चौकात १, बस स्थानक परिसरात २ आणि वाकला रस्ता चौफुली येथे २ असे गावात ठिक ठिकाणी एकुण १० सिसीटिव्ही कॅमेरे एका वायरच्या सहाय्याने काही महिण्यापुर्वी बसविले होते. त्यास पंधरा वित्त आयोगातुन सुमारे ८८ हजार रुपये खर्च झाले. परंतू त्यापैकी चार ते पाच कॅमेरे थोड्याच दिवसात अपोआप बंद झाले. ते मध्यंतरी झालेल्या अवकाळी पावसाच्या पाण्यामुळे पुन्हा सुरू झाले. तर १२ डिसेंबर रोजी दीपावलीच्या दिवशी गावात सायंकाळच्या सुमारास एक अवजड वाहन गावात होते. त्याच्या मागिल बाजूच्या हुड मध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकातून बस स्थानक परिसरातील दोन आणि वाकला रोड चौफुली श्री.पिनाकेश्वर देवस्थान स्वागत कमानीवर लावलेल्या दोन कॅमेऱ्यांना गेलेली वायर अडकून तुटल्याने महत्वाचे असलेले चार कॅमेरे बंद पडले आहे.
वाकला रोड चौफुली येथे श्री पिनाकेश्वर महादेव मंदिर स्वागतवर कमानीवर उजव्या बाजूला जोडलेले कॅमेरे दिसत आहे.
![]() |
एकंदरीत ८८ हजार रुपये खर्च करून बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे काही महिन्यातच बंद पडले असून विशेष म्हणजे वरील कॅमेऱ्याने केलेली चित्रीकरण पाहण्यासाठी कार्यालयामध्ये संगणक प्रणालीच्या एलईडी टीव्हीवर जोडलेले होते. नागरिकांनी ओरड केल्यानंतर ग्रामपालिका प्रशासनानेे पुन्हा काही निधी खर्च करून एक एलईडी टीव्ही विकत घेतलाअसून, आणखी अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची योजना पदाधिकारी आखत असल्याचे समजते. आगोदर बसविलेल्या दहा सीसीटीव्ही कॅमेऱ्यान साठी जवळपास लाखभर रुपये खर्चझालेले असून गावचा भौगोलिक विस्तार मोठा असल्याने वरील योजनेत खर्च केलेले रक्कम ही जवळपास काही महिन्यात वाया गेले असल्याचे दिसून आले असतांना, शासनाच्या वित्त आयोगातून मिळालेल्या निधीतून स्थानिक प्रशासन पुन्हा खर्च का करत आहे याबाबत गावात चर्चा सुरू आहे.
0 Comments