वेहेळगाव येथे वारकरी भवनाचे आ.कांदे यांच्या हस्ते भुमी पुजन

  By-Aavaj marathi team

 आमदार निधी अंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या वारकरी भवन कामाचे आ.सुहास आण्णा कांदे व उपस्थित वारकऱ्यांच्या हस्ते वेहेळगाव येथे करण्यात आले भूमिपूजन.

.



नांदगाव तालुक्यातिल वेहेळगाव येथे सुरु असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह निमित्त्याने मोठ्या संख्येने उपस्थित वारकरी भाविक उपस्थित होते. याप्रसंगी आ. सुहास अण्णा कांदे भेट दिली यावेळी त्यांनी येथील वारकरी संप्रदायाच्या मागणी चा मान ठेवूण त्यांनी येथे एक वारकरी भवनाच्या कामाचे भूमी पूजन श्रीफळ वाढविले व वारकरी मंडळींच्या हस्ते केले.
 याप्रसंगी मनोगत व्यक्त करतांना आ.कांदे म्हणाले की, तरुणांना व्यभिचार आणि व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी गावोगावी वर्षातून एक वेळ अखंड हरिनाम सप्ताह आणि धार्मिक कार्यक्रम नियमित होणे ही काळाची गरज आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, तसेच इतर साधू संतांच्या प्रगल्भ विचाराचे दाखले यावेळी त्यांनी दिले. 

तसेच वारकऱ्यांशी व उपस्थित नागरिकांशी संवाद साधला.  आणि काल्याच्या महाप्रसादाच्या प्रसंगी संकल्प सोडत पंगतीमध्ये वाढण्याचा लाभ घेतला.

काल्याच्या कीर्तनाच्या महाप्रसादाचे पंगतीमध्ये वाढताना आमदार सुहास आण्णा कांदे



या प्रसंगी पंचक्रोशीतील महिला आणि वारकरी ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments