जातेगाव येथील प्रभु श्रीराम भक्तांनी घरोघरी जावून राम जन्मभूमी अयोध्या येथून आलेल्या अक्षतांचे मंगळवार दि.१६ रोजी सकाळी आठ वाजेपासून वाटप करण्यास सुरुवात केली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, येथील पुरातन श्री राम मंदिरात सकाळी पुजा अराधना करुण येथील आगोदर ग्रामदेवता श्री पिनाकेश्वर महादेव, बेरोबा मंदिर, सप्तश्रृंगी देवी, हनुमंतराय इत्यादी देवी देवतांना २२ तारखेला अयोध्या येथे होणाऱ्या श्रीराम, माता सिता आणि बंधू लक्ष्मण यांच्या मूर्तींच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे निमंत्रण पत्रिका आणि अक्षदा अर्पन, वरील कार्यक्रम निर्विघ्न पार पडू देण्यासाठी साकडे घालण्यात आले.
नंतर गावात घरोघरी जावून आणि चौका चौकात तसेच सार्वजनिक ठिकाणी आणि आठवडे बाजारात प्रत्येक व्यक्तीची भेट घेऊन श्रीराम मंदिर भक्त मंडळाच्या वतीने निमंत्रण देऊन अक्षदा वाटप करण्यात आल्या. यासाठी श्रीराम मंदिर तरुण मित्रमंडळ आणि महिला मंडळाने विशेष परिश्रम घेतले, याप्रसंगी नागरिकांमध्ये मोठा प्रतिसाद दिसून आला.
0 Comments