By-Aavaj marathi team
नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागीय इंधन बचत कार्यक्रमास दि.१६ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या मासिक काळात इंधन बचत कार्यक्रमाचे उदघाटन नुकतेच नांदगाव परिवहन आगारात पार पडले.
यावेळी मालेगाव येथील उप प्रादेशिक परिवहन विभागाचे वहन निरीक्षक भरत भवाळ यांच्या हस्ते मासिक इंधन बचत कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नांदगाव आगाराचे व्यवस्थापक हेमंत पगार होते, तर प्रमुख अतिथी प्रा. सुरेश नारायणे होते.वहन निरीक्षक भरत भवाळ म्हणाले की, इंधन बचत करणे काळाची गरज आहे, त्यासाठी महामंडळाच्या बस चालकांनी काही तांत्रिक बाबी लक्षात घेऊन इंधन बचत कशी करता येईल या दृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे आहे.
गॅस गाडी असेल तर टँकचं झाकण घट्ट लावल्याची खात्री करून घ्या, टँकचं झाकण घट्ट लावलेलं नसेल तर गाडीतला गॅस लीक होऊ शकतो, त्यामुळे तुमची गाडी अपेक्षित मायलेज देणार नाही. गाडी कुठल्याही कारणानं जागीच उभी असेल, तर ती बंद ठेवा. चालू ठेवू नका. त्यामुळेही इंधनाची बचत होईल.गाडीच्या एक्डेसलेटर पण हळूहळू दाब द्या. गाडीची गती सावकाश वाढवा, विशिष्ट वेग मर्यादेतच गाडी चालवा, त्यामुळे इंधन बचत होईल. यावेळी त्यांनी बस कर्मचारी वर्गाशी हितगुज केले. हल्ली पेट्रोल, डिझेल, आणि गॅसचा साठा मर्यादित होत चालला आहे, पारंपरिक इंधन संपत्तीचा साठा कमी होत असल्याने सामान्य जनतेने वाहानांचा वापर आवश्यक तेव्हाच करावा.
नागरिकांनी इंधन बचतीत स्वयंस्फूर्तीने सहभागी होऊन इंधन बचतीसाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. तसेच आठ दिवसांतून एक दिवस वाहनांचा वापर बंद केल्यास इंधन बचतीसाठी नक्कीच मोठ्या प्रमाणात हातभार लागेल असे प्रतिपादन प्रमुख अतिथी प्रा. सुरेश नारायणे यांनी मनोगतातून व्यक्त केले. तर अध्यक्षीय मनोगतातून आगार व्यवस्थापक हेमंत पगार यांनी इंधन बचतीसाठी नांदगाव परिवहन विभागाचे सर्वच कर्मचारी सातत्याने प्रयत्न करत असतात. मागील काही महिन्यात नांदगाव आगराने इंधन बचत करून नाशिक विभागातुन नफ्यात अव्वलस्थानी असल्याचे त्यांनी सांगितले व आगारातील सर्व कर्मचारी वर्गाचे त्यांनी कौतुक केले. यावेळी आगाराचे सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक इश्वर सानप, अरुण इप्पर, एस. पी. गिरी, डी. पी. जगधने,बि. बी. चव्हाण, पि.जी. ठाकरे, डी. एम. भाबड, आर.के.गायकवाड, एस.पी. खाडे, एस.पी. जगधने, ए. व्हि. सानप, वाहन परीक्षक राजु कटारे, मयुर सुर्यवंशी, विनोद इप्पर तसेच डेपोतील सर्व मॅकिनिक कर्मचारी अणि बस वाहक आणि चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments