वारकरी संप्रदायातील कीर्तनकार मंडळिंनी आ. सुहास अण्णा कांदे यांचा सत्कार आ.कांदे यांनी मानले आभार

 टिम आवाज मराठी

सतत वारकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणारे नांदगाव तालुक्याचे भाग्यविधाते, जलदुत, तालुक्याचे प्रथम नागरिक, आ. सुहास अण्णा कांदे यांचा  मंगळवार दि. १७ रोजी तालुक्यातील सर्व हरिभक्त परायण कीर्तनकार व गायनाचार्य यांनी आ. कांदे यांच्या निवासस्थानी जावून प्रभू श्रीरामांचा फोटो, शॉल आणि श्रीफळ देऊन पुष्पहार घालून नागरि सत्कार केला.



याप्रसंगी बोलतांना वारकरी संप्रदायातील मंडळिंनी सांगितले की, आमदार सुहासअंण्णा कांदे यांनी वारकरी संप्रदायातील कीर्तनकार महाराज तसेच गायणाचार्य, मृदुंगचार्य यांना कोरोणा काळात आर्थिक व अन्नधान्याचा स्वरूपात खुप मोठे सहकार्य केले व वारकरी संप्रदायातील सर्वांचेत पाच पवित्र तिर्थक्षेत्रातिल तीर्थ आणुन चरनपुजान व भजनासाठी  लागणारे  (टाळ, पखवाज, विणा, हार्मोनियम) साहीत्य देऊन सन्मान केला. या उपक्रमामुळे बंद पडलेले आनेक गावातील भजन, हरिपाठ चालू झाले. अशा प्रकारे खूप मोठं सहकार्य केल्यामुळे तालुक्यात वारकरी संप्रदायातील नागरिकांना एक नव संजीवनी मिळाली असे गौरव उद्गार करत सन्मान केला.



. या प्रसंगी ह भ प ज्ञानेश्वर महाराज बोगीर, ह भ प भावराव महाराज निकम, ह भ प शिवाजी महाराज भालुर, ह भ प बाळकृष्ण महाराज बुरुकुल, ह. भ प सोमनाथ महाराज तांदळे, हं भ. प. वसंत महाराज डोमाडे, ह भ प तात्यासाहेब महाराज भुईगव्हान, ह भ प आविचातानद महाराज, ह भ प रामनाथ महाराज सांगळे, ह भ प तुकाराम महाराज गोडेगाव, ह भ प रामनाथ महाराज गोसावी, हे भ प विष्णू महाराज गीते, ह भ प विनायक महाराज हेबाडे,  ह भ प नंदु महाराज भालुर आणि ह भ प नंदकिशोर महाराज दौंड नांदगाव व तसेच संत मंडळी  तालुक्यातील वारकरी मंडळी मोठ्याा  संखेंने  उपस्थित होते. यावेळी आमदार सुहास अण्णा यांनी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त केले, व केव्हाही काही अडचण आल्यास संपर्क साधा मी सर्वत्रपरि प्रयत्न करील असे अश्वासन दिले.



Post a Comment

0 Comments