टिम आवाज मराठी
देवाज टॅक्सी युनियन स्टॉप कार्यालय, हुतात्मा सर्कल नांदगांव येथे मंगळवार दि. १६ रोजी देवाज टॅक्सी युनियन शाखेचे आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
यावेळी टॅक्सी चालक- मालक संघटनेच्या वतीन उपस्थीत सर्व मान्यवराचा सत्कार करण्यात आले, आमदार साहेबांनी सर्व टॅक्सीचालकांना नियमात राहुन योग्यवेळी गाड्यांचे मेन्टेनन्स करुन सर्व आवश्यक कागदपत्रांची पुर्तता ठेवून प्रवाश्यांना चांगली सेवा देणे बाबत मार्गदर्शन व सुचना केल्या. तसेच आपल्या सुखदुखाच्या काळात मी आणि बबीकाका नेहमी आपल्या पाठीशी राहू असे आश्वासन दिले.
टॅक्सी चालकाची रोजी रोटीचा मोठा गंभीर प्रश्न होता, रोज कमवणार तर रोज खाणार अशी त्यांची आर्थिक परिस्थीती आहे.टॅक्सीचालकांच्या अनेक समस्या होत्या, त्यांच्या अडचणी समजून घेत त्यांना एक युनियन स्थापन करुन दिली त्यांना आपल्या स्वखर्चातून एक कार्यालय, बैठक व्यसस्था,पिण्याच्या पाण्याची व्यवस्था इत्यादी सुविधा नविन टॅक्सी संघटनेचे स्वतःचे कार्यालय उपलब्ध करून देत त्यांची मोठी अडचण सोडवून दिली त्याबददल सर्व टॅक्सी चालक मालकांनी आण्णासाहेबांची कृतज्ञता व्यक्त करत आभार मानले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सुनिल जाधव यांनी केले. या प्रसंगी टॅक्सी (संघटनेचे) युनियनचे आजम खान, जाकीर शेख, इरफान शेख, अयाज शेख, मुदस्सीर पठाण, शाहरुख शेख, विजय बागुल, आरिफ शेख, अल्तमश शेख, मुज्जुभाई रंगरेज, सर्वच पदाधिकारी उपस्थित होते.
0 Comments