देशाच्या स्वातंत्र्यानंतर मोदीजींच्या नेतृत्वाखालील सरकारने केला भरीव विकास कामे केली त्यामध्ये प्रामुख्याने दळणवळणासाठी लागणारे रस्ते,महिला सक्षमीकरण, पंतप्रधान आवास योजना गोरगरीब, त्याचप्रमाणे देशातील सर्व नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून राबवलेली आयुष्यमान भारतकार्ड योजना राबवत असून प्रत्येक मंत्री आणि खासदारांना आपापल्या मतदारसंघात तसेच देशात प्रत्येक गाव खेडे विकासापासून वंचित राहू नये याबाबतसूचना दिल्या जातात केंद्र सरकारने दिलेल्या निधीचा योग्य विनयोग झाला का नाही. याबाबत अहवाल पंतप्रधान कार्यालयाला द्यावा लागतो असा, सुत्रबद्ध कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आहे, अयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदिर हे देखील भाजपा सरकारमुळेच झाले आहे, हे विसरून चालणार नाही असे नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथे नरेंद्र देवेंद्र प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री व कार्यक्रमाच्या अध्यक्षा ना. पवार ह्या म्हणाल्या.
या कार्यक्रमाची सुरुवात ना.भारतीताई पवार, विजय चौधरी, आ.सुहासअण्णा कांदे, वीरेंद्र कुकरेजा, नितीन पोफळे, दत्तराज छाजेड आणि मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून व छत्रपती शिवाजी महाराज यांची आरती करून करण्यात आली,तर याप्रसंगी आ.सुहासअंण्णा कांदे म्हणाले की,नांदगाव तालुक्यात कधी नव्हे इतका निधी खासदार ताई आणि आमदार निधी तसेच इतर फंडातुन विकास कामांसाठी खर्च करण्यात आले आहेत. त्यांनी सांगितले की, सुमारे ३५०० कोटी रुपये करण्यात आलेले असून आनखी मतदार संघातील अनुशेष भरून काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधिची अवशक्ता आहे, असे आ. कांदे म्हणाले. याप्रसंगी उपस्थित अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी नरेंद्र देवेंद्र प्रतिष्ठानच्यावतीने भाजपा प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांचा पुणेरी पगडी व स्मृतीचिन्ह देऊन करण्यात आला तर आयोजक समितीच्या वतीने, नामदार भारतीताई पवार यांना अयोध्या येथील श्रीराम मंदिराची प्रतिकृती देऊन सन्मानित करण्यात आला, तर आ. कांदे यांचा देखील स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला रवींद्र अनासपुरे, वीरेंद्र कुकरेजा, नितीन पोपळे आदींचा सन्मान करण्यात आला. तसेच याप्रसंगी जातेगाव आणि बोलठाण येथील सैन्य दलात वीरमरण आलेल्या सैनिकांच्या वीरमातांना देखील सन्मानित करण्यात आले, त्याच प्रमाणे सामाजिक, शैक्षणिक संस्था, तालुक्यातील निवडक ग्रामपंचायत विविध क्षेत्रातील आदर्श संस्था आणि व्यक्ती यांना देखील स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाचे निमंत्रक भाजपा व्यापारी आघाडीचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख व संस्थापक अध्यक्ष नरेंद्र देवेंद्र प्रतिष्ठान नांदगाव तालुका दत्तराज छाजेड, उपाध्यक्ष सागर फाटे, विक्रम निकम उमेश उगले आणि संचालक मंडळ होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोमनाथ तळेकर यांनी केले. तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ब्रिजेश पाटील, देविदास व्यवहारे, उद्धव वाघ, ज्ञानेश्वर नवले, रामेश्वर निकम, राजू कदम, राजेंद्र गवळी, सोमनाथ त्रिभुवन, भरत पाटील, संतोष घाडगे, ज्ञानेश्वर रिंढे, अमित जैन, विवेक पवार, निलेश चुडीवाल, योगेश वाळेकर, बाळू काळे, हरिचंद्र पाटील, अर्जुन वरपे, वाल्मीक वरपे, नितीन जाधव, शिवाजी लाठे यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.
0 Comments