Bay--Aavaj marathi team
नांदगाव तालुक्यातून दरवर्षी मोठ्या प्रमाणात ऊसतोड मजूर विविध साखर कारखान्याच्या क्षेत्रात राज्यात तसेच पर राज्यात स्थलांतरित होत असतात स्थलांतरित होणाऱ्या ऊसतोड मजुरांमध्ये प्रामुख्याने बंजारा, ठाकर, भिल्ल, वंजारी इत्यादी समाज बांधवांचा आणि आर्थिक दुर्लभ घटकांचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो. त्यांच्या मुला- मुलींचे शिक्षण अर्धवट राहु नये, यासाठी आ. सुहास अण्णा कांदे यांनी शासनाच्या योजने अंतर्गत तालुक्यात विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृह मंजूर केले त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणुन बंजारा समाज बांधवांनी त्यांचा सपत्नीक सत्कार केला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की नांदगाव तालुक्यातुन ऊसतोडीसाठी जातांना बऱ्याच ऊसतोड मजुरांना ना विलाजाने लहान मुलांना घरी सांभाळण्यासाठी कोणी नसल्याकारणाने आपल्या मुलांना सोबत घेवून जावे लागते. परिनामी मुलांच्या शिक्षणात खंड पडतो व अशिक्षित राहून जातात. आ.कांदे यांची विवीध कार्यक्रमामुळे ग्रामिन भागामध्ये जाने येने असल्याने वरील विषय गंभीर असल्याची त्यांच्या लक्षात आल्यामुळे शासनाकडून संत भगवान बाबा शासकीय वसतिगृह योजने अंतर्गत नांदगाव तालुक्यातून दरवर्षी विविध कामानिमित्त स्थलांतरित होणाऱ्या मजुरांच्या मुलांचे शिक्षण अर्धवट राहू नये यासाठी दोन वसतिगृह मंजूर करून आणली आहेत.
त्यासाठी प्रत्येक वेळेला मुंबईला कुठल्याही कामानिमित्त मंत्रालयात गेल्यानंतर सातत्याने पाठपुरावा केला होता. विविध कामानिमित्त स्थलांतरित होणाऱ्या नागरिकांच्या समाजामध्ये बंजारा समाज बांधवांची आर्थिक दुर्लभ घटकातील नागरिकांचि संख्या मोठ्या प्रमाणात असल्या कारणाने तालुक्यातील बंजारा समाज बांधवांच्या वतीने आ.सुहास कांदे व त्यांच्या सुविद्य पत्नी समाजसेविका सौ.अंजुमताई कांदे यांचा सत्कार केला.
यावेळी जिल्हा बँकेचे अधिकारी एन. के.राठोड, कृ उ बा.चे माजी संचालक रामचंद्र चव्हाण, पिंपरखेडचे ग्रा.प. सदस्य रमेश दळवी, जामदरीचे ग्रा.पं.सदस्य सखाराम चव्हाण, लोहशिंगवे ग्रा.पंचे सदस्य गणेश चव्हाण, जातेगांव ग्रा.पंचे माजी उपसरपंच भाऊसाहेब चव्हाण, डॉ. प्रकाश चव्हाण, हेमराज चव्हाण ढेकू, पिटूभाऊ राठोड चांदोरा, भरत चव्हाण, दीपक नायक, पुष्पराज राठोड, ज्ञानेश्वर चव्हाण आदी समाज बांधव उपस्थित होते.
0 Comments