या ग्रामपालिकेंनी व्यावसायिकांना बजाविल्या नोटीसा

 Bay-Aavaj marathi team

 नांदगांव तालुक्यातील घाटमाथ्यावरील जातेगाव आणि बोलठाण या दोन्ही ग्रामपालिकेंनी सोमवार दि. २२ रोजी अयोध्या येथे प्रभु श्रीरामांच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार असल्याने सोमवारी आपल्या गांवातील देशि-विदेशी दारुचे दुकाणे, मांसाहारी हॉटेल मटन, चिकन, मच्छी विकणारे व्यावसायिक यांना नोटिस बजावून आपापले दुकाने (व्यवसाय) बंद ठेवणे बाबत सुचना दिल्या आहे. 




या पत्रामध्ये दोन्ही ग्रामपालिकेंनी वरील व्यवसाय करणार्या सर्व व्यवसायीकांना नोटिस बजावून त्याची पोहच मिळाल्या बाद्दल सह्या घेतल्या असून मांसाहारी हॉटेल त्याचप्रमाणे व्यवसाय करणारे तसेच देशी-विदेशी दारू विकणारे यांनी प्रभू श्रीराम मंदिर आणि मूर्तीची प्राणप्रतिष्ठा हा विषय देशातील नागरिकांचा श्रद्धेचा आणि आस्थेचा विषय असून, आम्ही सर्व व्यावसायिक सहकार्य करू कुठल्याही प्रकारचा व्यवसाय सुरू ठेवणार नाही याबाबत सर्वांनी आश्वासन दिले.




Post a Comment

0 Comments