Bay- Aavaj marathi teamश्रीरामश्रीराम मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेचे अवचित्य साधून अखिल भारतीय हिंदू समाजाच्या आवाहनाला प्रतिसाद देत, नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथे सकाळ पासूनच हिंदू बंधू-भगिनींनी घरासमोर सडा रांगोळ्या काढून घरावर गुढ्या उभारून दिवसाची सुरुवात जल्लोषात केली
![]() |
श्रीराम मंदिराच्या आतील बाजू केलेली फुलांनीसजावट |
सोमवार दि. २२ रोजी अयोध्या येथे श्रीराम यांची प्राणप्रतिष्ठा होणार असल्याने, येथील हिंदु समाज बंधू- भगिनी सकाळ पासूनच उत्सवात होते. सकाळी आपापल्या घरासमोर सडा रांगोळी करून, आपल्या घरावर गुढ्या उभारल्या. तसेच श्रीरामाचे चित्र असलेला भगव्या रंगाचा ध्वज आपल्या घरावर लावले. अनेक तरुणांनी व नागरिकांनी भगवे शर्ट आणि टोपी परिधान केली होती व आपापल्या वाहनांना देखील भगवा रंगाचे ध्वज लावले होते, आयोध्या येथील श्रीराम मंदिर न्यासाने केलेल्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद देत महिला वर्गाने आपल्या घरासमोर सायंकाळी स्वच्छता करून रांगोळी वगैरे काढून त्यानंतर घराच्या बाहेर तेलाचे दीपक प्रज्वलित केले. याप्रसंगी गावातील नागरिकांनी सायंकाळी प्रचंड आतिषबाजी करून दुसरी दीपावली साजरी केली.
येथील श्रीराम मंदिर हिंदू भक्त मंडळाने मंदिरावर आणि समोर आकर्षक विद्युत रोषणाई करून मंदिराच्या आतील बाजूस आकर्षक फुलांनी सजावट केली होती. सायंकाळी सात वाजता प्रभू श्रीरामांच्या महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी हजारोच्या संख्येने हिंदू बंधू भगिनी उपस्थित होते. श्रीराम मंदिर भक्त मंडळाच्या वतीने उपस्थित भक्तांना बुंदी लाडूचा प्रसाद वितरीत केला. याप्रसंगी प्रभू श्रीरामांच्या भक्ती गीतांवर डीजेच्या गाण्यावर नृत्य करून आनंद उत्सव साजरा केला, सर्व धार्मिक कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीराम मंदिर तरुण भक्त मंडळाने परिश्रम घेतले.
सोमवार दि. २२ रोजी अयोध्या येथे श्रीराम यांची प्राणप्रतिष्ठा होणार असल्याने, येथील हिंदु समाज बंधू- भगिनी सकाळ पासूनच उत्सवात होते. सकाळी आपापल्या घरासमोर सडा रांगोळी करून, आपल्या घरावर गुढ्या उभारल्या. तसेच श्रीरामाचे चित्र असलेला भगव्या रंगाचा ध्वज आपल्या घरावर लावले. अनेक तरुणांनी व नागरिकांनी भगवे शर्ट आणि टोपी परिधान केली होती व आपापल्या वाहनांना देखील भगवा रंगाचे ध्वज लावले होते, आयोध्या येथील श्रीराम मंदिर न्यासाने केलेल्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद देत महिला वर्गाने आपल्या घरासमोर सायंकाळी स्वच्छता करून रांगोळी वगैरे काढून त्यानंतर घराच्या बाहेर तेलाचे दीपक प्रज्वलित केले. याप्रसंगी गावातील नागरिकांनी सायंकाळी प्रचंड आतिषबाजी करून दुसरी दीपावली साजरी केली.
प्रभू श्रीराम मंदिर येथे महा आरतीच्या वेळी आलेला जनसागर
येथील श्रीराम मंदिर हिंदू भक्त मंडळाने मंदिरावर आणि समोर आकर्षक विद्युत रोषणाई करून मंदिराच्या आतील बाजूस आकर्षक फुलांनी सजावट केली होती. सायंकाळी सात वाजता प्रभू श्रीरामांच्या महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी हजारोच्या संख्येने हिंदू बंधू भगिनी उपस्थित होते. श्रीराम मंदिर भक्त मंडळाच्या वतीने उपस्थित भक्तांना बुंदी लाडूचा प्रसाद वितरीत केला. याप्रसंगी प्रभू श्रीरामांच्या भक्ती गीतांवर डीजेच्या गाण्यावर नृत्य करून आनंद उत्सव साजरा केला, सर्व धार्मिक कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीराम मंदिर तरुण भक्त मंडळाने परिश्रम घेतले.जातेगांव येथे श्रीराम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात
0 Comments