By--Team Aavaj marathi
नांदगाव येथे आ. सुहास आण्णा कांदे यांच्या आदेशाने येथील संपर्क कार्यालय येथे आज हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली, याप्रसंगी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत विनम्र अभिवादन करण्यात आले. अमर रहे अमर रहे बाळासाहेब अमर रहे, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो अशा घोषणांनी परिसर दणाणला.
यावेळी मान्यवरांनी बाळासाहेबांबाबत आठवणिंना उजाळा देताना म्हणाले की, हिंदुरुदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म २३ जानेवारी १९२६ रोजी झाला होता.
त्यांनी सर्वप्रथम एक व्यंगचित्रकार म्हणून सामाजिक प्रश्नांवर भाष्य करण्यास सुरुवात केली. इ.स. १९५० मध्ये ते 'फ्री प्रेस जर्नल’ मध्ये व्यंगचित्रकार म्हणून रुजू झाले. पुढील काळात त्यांनी ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर.के. लक्ष्मण यांच्यासमवेतही काही काळ काम केले. फ्री प्रेस जर्नलमध्ये काम करीत असतानाच स्व. बाळासाहेब विविध संस्थांसाठी, कंपन्यांसाठी व नियतकालिकांसाठी चित्रे, व्यंगचित्रे, जाहिरातीचे डिझाइन या क्षेत्रांतही काम करीत असत. त्यांच्या व्यंगचित्रात इंदिरा गांधींची व्यक्तिरेखा आवडती होती. , इ.स. १९६० मध्ये ‘मार्मिक’ हे साप्ताहिक सुरू केले. साप्ताहिकासाठीचे हे ‘मार्मिक’ नाव बाळासाहेबांना वडील प्रबोधनकारांनी सुचविले होते. मराठीतील हे पहिले व्यंगचित्र साप्ताहिक ठरले होते.बाळासाहेब ठाकरेंनी जून १९, इ.स. १९६६ रोजी शिवसेनेची स्थापना केली.
'समाज सुधारकांची समृद्ध परंपरा असलेला महाराष्ट्र पुरोगामी आहे, पण मराठी माणूस मागेच राहिला आहे. महाराष्ट्रात सुविधा आहेत, पण मराठी माणूस दुविधेत आहे. महाराष्ट्रात उद्योग आहेत, पण मराठी तरुण बेरोजगार; तर महाराष्ट्रात पैसा आहे पण मराठी माणूस गरीब आहे. महाराष्ट्राला भारतात मान आहे पण मराठी माणूस महाराष्ट्रातच (प्रामुख्याने मुंबईत) अपमानित होतो आहे.' शिवसेनेचा पहिला मेळावा ऑक्टोबर ३०, इ.स. १९६६ रोजी शिवतीर्थ मैदानावर संपन्न झाला. ज्यात सुमारे ५ लाख लोकांचा सहभाग होता.
आ.सुहास अण्णा कांदे यांच्या संपर्क कार्यालयात स्व. बाळासाहेब ठाकरे जयंती साजरी करताना शिवसेनेचे पदाधिकारी व्हिडिओ बघण्यासाठी खालील लिंक ला टच करा
या प्रसंगी राजाभाऊ जगताप, नंदू भाऊ पाटील, बाजार समितीचे सभापती अर्जुन पाटील, उप सभापती पोपट सानप, शिवसेना शहर प्रमुख सुनील जाधव, एकनाथ सदगिर, समाधान पाटील, दीपक मोरे, भैय्या पगार, अनिल वाघ, निलेश ईप्पर, मधू मोरे, दिनेश ओचानी, डॉ.प्रभाकर पवार, महेंद्र गायकवाड, बापू जाधव, राजू सोमासे, सुनील काळे, राम शिंदे, सुनील सोर, नितीन सोनावणे, प्रकाश गीते, तसेच शिवसेना महिला आघाडीच्या रोहिणी मोरे, भारती बागोरे, भारती बोरसे, सोनिया सोर, नयना खटके, जान्हवी शर्मा, नम्रता सांबरे,निशा चव्हाण, रेणुकाबाई बाहीकर, राधा सांबरे, गीता शिंदे, प्रतिभा सोर, कल्पना बोळीज कल्पना चव्हाण, अंजली मैंद आदी उपस्थित होते.
0 Comments