Team Aavaj marathi
व्हाट्सअप आणि फेसबुकच्या व इतर माध्यमातून सोशल मीडियावर अफवा पसरविने, किंवा एखाद्या समाजाबद्दल आक्षेपार्य मजकूर शेअर करणे, धार्मिक भावना दुखविणे, अशा प्रकारचा मेसेज, फोटो, व्हिडीओ शेअर करणे आता पडणार महागात.
नांदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रितम चौधरी यांनी तालुक्यातील सर्व नागरिकांना आवाहन केले की व्हाट्सअप आणि फेसबुकच्या तसेच इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून चुकीच्या अफवा पसरविणे किंवा एखाद्या समाजाबद्दल अक्षयकिंवा एखाद्या समाजाच्या भावणा दुखतील असा मजकूर शेअर करणे, धार्मिक भावना दुखावणे इत्यादी मेसेज पाठविणे, फोटो किंवा व्हिडिओ शेअर करून शांततेचा भंग करणाऱ्यांवर आता कडक कायदेशीर कार्यवाही करणार आहे.
काय म्हणाले पोलिस निरीक्षक चौधरी हे बघण्यासाठी यासाठी खालील लिंक ला टच करा
तालुक्यातील सर्व whatsapp चे ग्रुपप ॲडमिन यांनांनी आवाहन केले की, अशा प्रकारचे मेसेज प्रकाशित शेअर केल्यास ग्रुप ॲडमिन वर आणि चुकीचे मेसेज शेअर करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होणार असून याबाबत सर्वांनी खबरदारी घ्यावी तसेच वैयक्तिक फेसबुक आणि इतर सोशल मीडियावर देखील शांततेचा भंग होईल अशा प्रकारचे मेसेज शेअर करू नये तालुक्यातील सर्व नागरिकांनी याबाबत खबरदारी घ्यावी असे पोलीस निरीक्षक चौधरी यांनी आवाहन केले आहे. आपणा सर्वांना आवाज मराठी या वेब न्यूजर्टल द्वारे मे. पो.नि. चौधरी सो. यांनी केलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे असे अवहाण करण्यात येत आहे.
0 Comments