चालक दिनाचे अवचित्य साधून रस्ता सुरक्षा अभियान चालकांचा केला सन्मान

 Aavaj marathi team
नांदगांव परिवहन आगगराचे वतीने दरवर्षी राबविण्यात येणाऱ्या वाहन चालक दिनाचे अवचित्य साधून दि.२४ रोजी परिवहन आगारामध्ये वीणा अपघात चालक वाहन चालक म्हणून सेवा देणारे श्री. बि.बी चव्हाण, आर. एन. कटारे, एच. बी. पाटील, एस. एस. ताडगे, एन. आर. शेख, डी. के. इप्पर ह्या सहा बस चालकांचा आगार प्रमुख हेमंत पगार, कार्यशाळा प्रमुख ईश्वर सानप, स्थानक प्रमुख विनोद ईप्पर यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.



 यावेळी आगार प्रमुख पगार यांनी सर्व उपस्थित चालकांना दोन वाहनांच्या मध्ये सुरक्षित अंतर ठेवने बाबत तसेच ओव्हरटेक करताना घ्यावयाच्या काळजी व इंधन बचती बाबत मार्गदर्शन केले, नांदगाव आगाराने घाटमाथ्यावरील नागरिकांची छत्रपती संभाजी नगर बस सुरु करणे बाबत अनेक दिवसांच्या मागणी नुसार गेल्या दोन दिवसांपासून नांदगाव येथून सकाळी नांदगांव ते छ.संभाजी नगर ७.३० वाजता बस सेवा सुरुवात केली असून हि बस सकाळी ८.३० जातेगाव, बोलठाण मार्गे छ. संभाजी नगर येथे १०.४५ वाजता पोहचनार आहे. व तेथून परत ११ वाजता निघनार असून १.१५ दरम्यान बोलठाण, जातेगांव येथे येनार आहे. तरी घाटमाथ्यावरील नागरिकांनी सुरुवात केलेल्या बस सेवेने सुरक्षित प्रवास करावा असे अवाहन  कार्यशाळा प्रमुख ईश्वर सानप यांनी केले.

नव्याने सुरू झालेल्या छत्रपती संभाजी नगर चालक वाहकाचा जातेगाव येथे सत्कार 




गेल्या अनेक दिवसांपासून घाठमाथ्या वरील नागरिकांच्या मागणीनुसार गेल्या दोन दिवसांपासून नव्याने सुरुवात करण्यात आलेले नांदगाव ते छत्रपती संभाजीनगर या बसचे चालक एस.पी.गिरी आणि  वाहक भूषण वाघ यांचा जातेगांव येथे शाल देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी येथील नागरिक आणि प्रवाशी मोठ्या संखेने उपस्थित होते. जातेगाव बोलठाण मार्गे नियमित छत्रपती संभाजीनगर येथे जाण्यासाठी बस सेवा सुरू ठेवायची असल्यास प्रवाशी बांधवांनी बसनेच प्रवास करावा, जेने करुन परिवहन विभागाचे उत्पन्नात भर पडेल व परिवहन विभाग गाडी नियमित स्वरूपात ठेवेल असे चालक एस.पी.गिरी यांनी प्रवासीवर्गास सांगितले.

Post a Comment

0 Comments