अभिनेते नाना पाटेकर नाशिक जिल्ह्यातील या तालुक्याच्या दौऱ्यावर त्यांच्या हस्ते होणार मान्यवरांचा सन्मान

 Bay--team aavaj marathi 

 नाम फाऊंडेशन चे संस्थापक नाना पाटेकर व अभिनेते श्री नाना पाटेकर हे आज मंगळवारी नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्याचे दौऱ्यावर येत असून विधानसभेचे उपाध्यक्ष ना.श्री.नरहरी झिरवाळ फाऊंडेशन तर्फे कृषी भूषण पुरस्कार प्राप्त व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या भूमी पुत्रांचा सन्मान सोहळ्यास उपस्थित असणार आहेत.


 त्यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना गौरविण्यात येणार आहे.विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या उपस्थितीत वनारे येथे आज सन्मान आयोजित करण्यात आला आहे. त्यात कृषी क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाने नुकतेच दिंडोरी तालुक्यातील सुरेश कळमकर, सम्राट राऊत, दामोदर सानप, पुनम डोखळे चार शेतकऱ्यांना कृषी भूषण पुरस्कार जाहीर केला त्यांचेसह NDA मध्ये कॅप्टन म्हणून निवड झालेल्या शुभांगी चौधरी, आणि धनुर्विद्या क्रीडा प्रकारात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या वैष्णवी परदेशी व आदिवासी सेवक पुरस्कार प्राप्त उद्धव मोरे, धोंडीराम थैल, रघुजी गवळी, ज्ञानेश्वर भोये, 

तसेच साहित्य पुरस्कार प्राप्त उपजिल्हाधिकारी हिरामण झिरवाळ, मूर्तिकार विष्णू पवार, उद्योजिका सुमित्रा जाधव, उद्योजक पुरुषोत्तम गायकवाड, गायक मिथुन कोंढवले, मयूर चव्हाण, मनोहर भसरे आदी मान्यवरांचा सन्मान अभिनेते नाना पाटेकर यांचे हस्ते होणार आहे .

त्यानंतर पाणी अडविणे साठी नाम फाऊंडेशन तर्फे काम करणारे अभिनेते नाना पाटेकर हे होणार्या पावसाचे पाणी अडवून ते वळविण्याचे महत्वपूर्ण मांजरपाडा (देवसाने) प्रकल्प तसेच विविध वळण योजना व प्रस्तावित वळण योजना, पाणी प्रकल्पांची विधानसभा उपाद्यक्ष झिरवाळ यांचेसह ते पाहणी करणार आहे, तरी वरील या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन वनारेचे सरपंच दीपक झिरवाळ, गोकुळ झिरवाळ यांनी केले आहे. 


Post a Comment

0 Comments