मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत ‘पंचवटी अयोध्या आस्था एक्सप्रेस’ मनमाड स्थानकातून रवाना ना. भुजबळांनी अयोध्या एक्सप्रेसला दाखवला हिरवा झेंडा

 Bay--Team aavaj marathi 

बुधवार दि.६ मार्च येवला व नांदगाव मतदार संघातील सुमारे १४७६ ज्येष्ठ नागरिक, महिला व तरुणांना घेऊन प्रभू रामलल्लाच्या दर्शनासाठी ‘पंचवटी अयोध्या आस्था एक्सप्रेस’ मनमाड स्थानकातून बुधवारी रात्री ८.१० मिनिटांनी रवाना झाली.या गाडीला राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी मनमाड रेल्वे स्थानकातून ‘ हिरवा झेंडा दाखविला. यावेळी त्यांच्या समवेत माजी आमदार पंकज भुजबळ उपस्थित होते.दरम्यान ना. छगन भुजबळ यांनी नाशिक येथून ट्रेन मध्ये सहभागी झालेल्या भाविकांशी संवाद साधत. नाशिक ते मनमाड त्यांच्यासमवेत प्रवास केला.

यावेळी शहराध्यक्ष रंजन ठाकरे, प्रदेश पदाधिकारी दिलीप खैरे, बाळासाहेब कर्डक, पंढरीनाथ थोरे, वसंत पवार, साहेबराव मढवई, भाऊसाहेब भवर, शिवाजी सुपनर, भोलाशेठ लोणारी, मोहन शेलार, दिपक लोणारी, प्रा.ज्ञानेश्वर दराडे, सुनील पैठणकर, विजय खैरनार, डॉ.श्रीकांत आवारे, मंगेश गवळी, दत्ता रायते, अशोक नागरे, पांडुरंग राऊत, विलास गोऱ्हे, सुरेखा नागरे, बाळासाहेब गुंड, नवनाथ काळे, साहेबराव आहेर, बाळासाहेब लोखंडे, प्रसराम दराडे, संतोष खैरनार, भागीनाथ पगारे, अशोक कुळधर, समाधान जेजुरकर, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, शहराध्यक्षा कविता कर्डक, संजय खैरनार, धीरज बच्छाव यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


नाशिक ही प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. सुमारे १४ वर्षाहून अधिक काळ प्रभू रामचंद्राचे या नगरीत वास्तव्य राहिले आहे. त्यामुळे प्रभू रामचंद्राची कर्मभूमी असलेल्या नाशिक ते जन्मभूमी असलेल्या अयोध्या हा प्रवास होऊन प्रभू रामलल्लाचे दर्शन ज्येष्ठ नागरिकांना व्हावे यासाठी मंत्री छगन भुजबळ, आणि माजी आमदार पंकज भुजबळ यांच्याकडून ज्येष्ठ नागरिकांना 'पंचवटी अयोध्या आस्था एक्सप्रेस'ची व्यवस्था करण्यात आली. 



या प्रवासासाठी सुमारे २२ डब्यांची ‘पंचवटी अयोध्या आस्था एक्सप्रेस’ ही बुधवार ६ मार्च रोजी सायंकाळी ८.१० वाजता मनमाड स्थानकातून अयोध्या कडे रवाना करण्यात आली. त्यानंतर दि.७ मार्च रोजी रात्री ९.३० वाजता अयोध्या येथे ही ट्रेन पोहचणार आहे. तर दि.८ मार्च रोजी दुपारी ४.४० वाजता अयोध्या येथून मनमाडकडे प्रयाण करून दि. ९ रोजी रात्री ८ मनमाड येथे पोहचणार आहे.   


या प्रवासातील नियोजनासाठी प्रमुख २२ पदाधिकाऱ्यांचा समावेश असलेली समिती तयार करण्यात आली असून प्रवासामध्ये जेवण, नाश्ता, चहा यासह निवासाची व दर्शनाची सुविधा असणार आहे. या प्रवासात ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी प्रत्येक डब्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते असणार आहे. 


Post a Comment

0 Comments