राज्य तसेच केंद्र सरकारने देशातील नागरिकांना विविध शासकीय कार्यालयात तत्पर सेवा सुविधांचा लाभ मिळावा यासाठी अनेक नियम बनविले.
परंतु ग्रामीण भागात शासकीय व निमशासकीय कार्यालयात सेवा देणारे ग्रामसेवक, तलाठी, मंडल अधिकारी, कृषी सहायक, कृषी मंडल अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी आरोग्य सेवक, आरोग्य सहाय्यक आणि इतर कर्मचारी, प्राथमिक माध्यमिक विद्यालयातील शिक्षक इत्यादी अपवाद वगळता बहुतांश कर्मचारी आपल्या मुख्यालयी न राहता महिन्यातून ठराविक दिवस आपल्या नियुक्तीच्या ठिकाणी येऊन हजेरी पुस्तकात इतर दिवशी हजर असल्याचे दाखवून सर्व दिवसांच्या ठिकाणी सह्या करून कार्यालयात उपस्थित न राहता महिनाभराचा पगार घेतात. स्थानिक नागरिकांनी चौकशी केली तर त्यांना रजेवर होतो, वरिष्ठ कार्यालयात मिटिंग होती इत्यादी कारणे सांगितली जातात.
नागरिकांना शासकीय कार्यालयात तत्पर सेवा सुविधांचा लाभ मिळावा यासाठी सर्व शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या मुख्यालयात बायोमेट्रिक हजेरी पद्धतीचा अवलंब करणे बाबत नियमावली तयार करणे गरजेचे असून मुख्यालय सोडून इतर कारणांसाठी त्या कर्मचाऱ्यांना बाहेर जाने आवश्यक असेल तर त्यांनी मुख्यालयाच्या ठिकाणी ठळक अक्षरात काय कामानिमित्त बाहेर गेले आणि केव्हा येणार याबाबत सविस्तर लिहून ठेवणे गरजेचे आहे.
जेने करुण शेतकरी व इतर नागरिकांना संबंधित कार्यालयात विनाकारण हेलपाटे मारावे लागणार नाही. या बाबत राज्यातील अनेक ठिकाणच्या ग्रामपंचायत मध्ये ग्रामसभेत ठराव मंजूर करण्यात आलेले आहेत, परंतु कुठल्याही प्रकारची सुधारणा झाली नाही किंवा नियमावली तयार करण्यात आली नाही.तरी वरील जनतेच्या जिव्हाळ्याचा विषयाकडे सरकार लक्ष केव्हा देईल, व कर्मचारी उपस्थित १००% केव्हा होईल हा प्रश्न निरोत्तरीतच आहे.
नमस्कार वरील बातमी योग्य की अयोग्य याबाबत कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया व्यक्त करा.
0 Comments