दिंडोरी लोकसभेच्या भाजप उमेदवार डॉ.भारती पवार यांची आमदार सुहास कांदे यांच्या कार्यालयास भेट

 Bay team aavaj marathi 


दिंडोरी लोकसभेच्या भाजप उमेदवार व माजी केंद्रीय मंत्री डॉ.भारती पवार यांची आमदार सुहास कांदे यांच्या कार्यालयास भेट दिली. यावेळी आ. श्री.कांदे यांच्या वतीने माजी नगराध्यक्ष राजेश कवडे, माजी सभापती विलासराव आहेर, किरण कांदे, आनंद कासलीवाल, बाजार समिती संचालक अमोल नावंदर, राजाभाऊ जगताप, युवा सेनेचे तालुकाप्रमुख सागर हिरे, प्रमोद भाबड, किरण देवरे, शहर प्रमुख सुनील जाधव, यांनी त्यांचा सत्कार केला.
 

यावेळी श्री.भाबड, हिरे, जगताप यांनी मतदार संघातून मागील पंचवार्षिक निवडणुकीत तालुक्यातून दिलेल्या मताधिक्या पेक्षा  अधिक मताधिक्य मिळवून देऊ असे सांगितले. याप्रसंगी भाजपच्या अँड.जयश्री दौंड,राजाभाऊ बनकर, पुरुषोत्तम निकम, दत्तराज छाजेड, सागर फाटे, गणेश शिंदे, रमेश काकळीज, बाजार समितीचे उपसभापती दिपक मोरे, प्रभाकर पवार, वाल्मिक निकम, प्रकाश शिंदे, सचिन उदावंत, शशी सोनावणे, भावराव बागुल, आदिंसह शेकडो शिवसैनिक, भाजप पदाधिकारी उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments