दांडी बहाद्दर कर्मचाऱ्यांना राज्य सरकारचा चाप रजेसाठी सादर करावा लागणार ऑनलाइन अर्ज

 Bay-- team aavaj marathi 


महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाने नुकत्याच काढलेल्या आदेशानुसार आता राज्य शासकीय अधिकारी व कर्मचारी यांचे सेवापुस्तक व रजेचे अर्ज दिनांक १ एप्रिल २०२४ पासून ऑनलाइन होणार आहे. त्यामुळे ऑफ रजेचा अर्ज मुख्यालयात ठेवून रजा उपभोगून आल्यानंतर पुन्हा रजेचा अर्ज कॅन्सल करून हजेरी पुस्तकात सह्या करून उपस्थित दाखवत होते,मात्र आता शासनाच्या नवीन निर्णयामुळे अशा दांडी बहाद्दर कर्मचाऱ्यांना आता लगाम लागणार आहे.

संग्रहित छायाचित्र 




एखाद्या शासकीय कर्मचाऱ्याला रजेवर जायचे असेल तर त्यासाठी राज्य शासनाने ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट सिस्टीम (E HRMS) प्रणाली विकसित केली आहे. या प्रणाली अंतर्गत सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी यांची डिजिटल सेवापुस्तके तयार करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. तसेच सर्व प्रशासकीय विभागांच्या नियंत्रणाखाली अधिनस्त कार्यालयांचा आयुक्तालय, संचनालय इत्यादींचा या eHRMS प्रणालीत समावेश करण्यात येणार आहे. या प्रणालीत रजेचे ऑनलाइन अर्ज सादर करण्याची सुविधा आहे. 

 बऱ्याच विभागामध्ये ऑनलाइन रजेचे अर्ज सादर करण्याचे प्रमाण फारच कमी आहे. eHRMS प्रणाली यशस्वी होण्यासाठी शासनाने सर्व मंत्रालयीन विभागांना सूचित करून दिनांक १ एप्रिल २०२४ पासून सर्व रजेचे अर्ज ऑनलाइनच प्रणालीमार्फत सादर करावेत.

कोणतेही रजेचे अर्ज ऑफलाईन घेण्यात येऊ नये असा देखील उल्लेख शासन आदेशात करण्यात आला आहे.या प्रणालीमुळे दांडी बहाद्दर कर्मचाऱ्यांना चाप बसणार असून वरील निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात आले आहे.


Post a Comment

0 Comments