बोलठाण येथे मोबाईल दुकानला आग लाखो रुपयांचे नुकसान आगीचे कारण अस्पष्ट

 Bay--team aavaj marathi 

{तुषार वाघ पत्रकार बोलठाण}, दि. २९... 

नांदगाव तालुक्यातील बोलठाण येथील हरिओम मोबाईल शॉप या दुकाकास शुक्रवारी पहाटेच्या सुमारास अचानक आग लागल्याने मोठे नुकसान झाले आहे.


याबाबत सविस्तर वृत्त असे की, येथील उमेश लालचंद दायमा यांच्या बस स्थानक परिसरात असलेल्या हरिओम मोबाईल शॉप या दुकाकास शुक्रवारी पहाटेच्या सुमारास येथील काही तरुण व नागरिक मॉर्निंग वॉक साठी जात असतांना त्यांना वरील दुकानातून धुर निघत असल्याचे दिसून आले असता त्यांनी दुकानाचे संचालक उमेश दायमा आणि त्यांचे बंधू पत्रकार निलेश दायमा यांच्याशी संपर्क करुन परिस्थिती बाबत माहिती दिली.



दायमा बंधू यांनी दुकानचे शटर उघडून नागरिकांच्या सहकार्याने आग विझवून आतील सामान बाहेर काढले. यामध्ये मोबाईल रिपेअरींग साठी लागणारे साहित्य चार लाख, बेसीक फोन ५० नग पन्नास हजार, जुने मोबाईल एक लाख दहा हजार रुपये, लॅपटॉप आणि इतर मिशनरी दिड लाख, दुकानचे फर्निचर एक लाख रुपये असे आठ लाख दहा हजार रुपयाचे नुकसान झाले असल्याचे येथील तलाठी जयेश मलधोडे यांनी पंचांसमक्ष केलेल्या पंचनाम्यात म्हटले आहे.

दुकानला लागलेल्या आगीचे कारण अद्याप समजलेले नसून वरील घटने बाबत वाच्यता होताच बोलठाण तसेच परिसरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे.

Post a Comment

0 Comments