परधाडी घाटात आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह

 Bay--team aavaj marathi 

मारुती जगधने पत्रकार नांदगाव {नाशिक}


नांदगांव तालुक्यातील परधाडी शिवारातील घाटात मंगळवार दि. २६ रोजी  सुमारे ३५ ते ४० वय असलेला पुरुष जातीचा बेवारस स्थितीत अज्ञात व्यक्ती मृत आवस्थेत नांदगांव पोलीसाना मिळून आला. या मृत व्यक्तीची हत्या की आकस्मिक मृत्यु या संदर्भात तर्कवितर्क व्यक्त होत आहे.

 वरील घटनेची नांदगाव पोलिस ठाण्यात अकस्मीक नोंद करण्यात आली आहे .मयत पुरुष हा परधाडी घाटात मिळून आला असून, त्याची उंची ५ फुट ५ इंच,वय सुमारे ३० ते ४० वर्षे,रंग सावळा, शरीरबांधा मजबुत,अंगावर आकाशी रंगाचा फुल शर्ट,राखाडी रंगाची फुल जिन् चड्डी, असे वर्णन आहे.

 वरील वर्णनाचा व्यक्ती बेपत्ता असल्यास नांदगांव पोलिसांना संपर्क करावा असे पो. नि. प्रितम चौधरी, आणि सा. पो. नि. सुनिल बडे यांनी आवाहन केले आहे. या पूर्वी देखील परधाडी घाटात मृत व्यक्ती सापडल्याच्या घटना घडल्या आहेत शिवाय सदर व्यक्ती बेवारशी असल्याने पोलीस घटनेचा विविध मार्गाने शोध घेत आहे .

Post a Comment

0 Comments