नांदगांव तालुक्यात समाधान करक पाऊस खरीप पेरणी बर्या पैकी आटोक्यात

 Bay team aavaj marathi 

मारुती जगधने जेष्ठ पत्रकार नांदगाव नाशिक 

 जुन महिण्यात या आठवड्यात पावसाची झालेली नोंद ११५ मि मी एवढी आहे या खरीप हंगामात या आठवड्यात पेरणीस योग्य असा पाऊस झाल्याने शेतकरी बांधवांनी पांभर पुजुन पेरणीला सुरवात केली आहे. तालुक्यात ६०९७५ हेक्टरवर पेरणीची उदीष्टे ठेवण्यात आले असून बर्या पैकी नगदी पीक म्हणून कपाशी तसेच तुर मका, मुग बाजरी तीळ धान्य व कडधान्य इत्यादी पिकांची लागवड आणि पेरणी शेतकरी बांधवांनी आटोक्यात आणली आहे.


आजुन तालुक्यातील शेती सिंचनात पुरेशी वाढ झालेली नाही तसेच रब्बीमध्ये देखील वाढ झालेली नाही.? परंतु मागील दुष्काळाचा शासनाकडून जनतेला कवडीचा फायदा झाला नाही. विषेश करुन शेतकर्याला विजबिल माफ किंवा कर्ज माफ किंवा शासनाच्या अन्य दुष्काळी योजनांचा कोणाताच लाभ तालुक्यातील जनतेला मिळाल्याचे दिसत नाही, झाला असेल तर ते जनमानसात पोहचले नाही पण मोठा लाभ झाल्याचा गवगवा नाही. या साठी सत्ताधारी व विरोधक सर्वांनीच उपोषने केली पण जनतेच्या पदरात माञ निराशाच आली.

तरी देखील छातीवर दगड ठेऊन हे सर्व बाजूला सावरून शेतकरी बांधव शेती मशागत करुन पेरणीच्या तयारीला लागला आहे .कृषी विभागाने फळबाग, बाजरी, ज्वारी, तृणधान्य, कडधान्य यांची उद्दिष्टे जाहीर झाली असली तरी ती उद्दिष्टे सालाबाद प्रमाणेच आहे, त्यात काही नविन नाही. तसेच कृषी विभागाकडून शेतकर्याना मिळणारे सवलतीचे बियाने किती शेतकर्याना पोहचले हे कृषी विभागाने नावा गावासह यादी  जाहीर करावी अशी मागणी होत आहे. नांदगांव शहरालगत कृषी बिजगुनन विभागाची सुमारे १० एकर जमीन माञ. मागील वर्षी पडीक होती या क्षेञातील दोन विहीरी दरवर्षी पाण्याने डबडबतात माञ खरीपात किंवा रब्बीत या जमीन वांजुट्याच असतात. या वर्षी दमदार पाऊस पडेल अशी आशा शेतकरी बाळगून आहे.

जुन मध्ये पावसाची सुरुवात तर चांगली झाली आहे शेतकरी खरीप पेरणीला लागला आहे. बर्या पैकी ठिकठिकाणी पेरणी पूर्ण झाली आहेत. सध्या यंञाच्या सहाय्याने शेती केली जात असल्याने, ज्या लहान क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांकडे ट्रॅक्टर व इतर यंञ नाही, त्यांना वेळेवर यंत्र मिळणे कठीन झाले आहे. ज्याच्या कडे यंञ आहे तो शेतकरी आधी स्वता: ची जमिन तयार करुन पेरणी करतो मगच दुसर्याच्या शेत जमीन मोलाने करुन देतात. तालुक्यात शेंद्रीय शेतीवर पुरेसा भर दिला जात नाही तसेच छताचे पाणी वाहून जाते या वर उपाय होताना दिसत नाही. रेन वॉटर हार्वेस्टिंग साठी व बायोगॅस चा मागुस दिसत नाही. भरपूर प्रचार तसेच इतर काही उपाययोजना करणे गरजेचे आहे.



Post a Comment

0 Comments