नांदगाव तहसीलदार सुनील सौदाणे यांना बुधवार दि. १२ रोजी निवेदन देण्यात आले यात त्यांनी म्हटले आहे की, लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागल्यामुळे गोरगरिब जनतेला शंभर रुपयांमध्ये आनंदाचा शिधा वाटप करण्यात आला नाही. व आचारसंहितेमुळे तो आनंदाचा शिधा वाटप झाला नाही तरी लवकरात लवकर आनंदाचा शिधा वाटप करण्यात यावा.
तसेच नांदगाव शहर व तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार ग्राहकांना धान्य वितरित करण्यात आल्याची पावती देत नसून यामध्ये फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे.
तरी ग्राहकांना ई पॉज मशीनची ऑनलाईन पावती देणे बाबत आदेश द्यावेत त्याबाबत दप्तरी नोंद घ्यावी. तसा कार्यवाही केल्याचा तसा लेखी स्वरूपात अहवाल मिळावा असे म्हटले आहे. या निवेदनावर अभिषेक विघे भाजपा युवा सरचिटणीस नांदगाव तालुका शहर लक्ष्मी गायकवाड माजी ग्रामपंचायत सदस्य बोलठाण व इतरांच्या सह्या असून प्रत्यक्ष उपस्थित होते.
0 Comments