नांदगांव तालुक्यात काल दुपारी विजांचा कडकडाट होत पावसाचे जोरदार आगमन झाले याच प्रसंगी खादगांव येथे शेतवार राहनारा विलास जंगलु गायकवाड वय २९ वर्षे हा शेतकरी दि ११. रोजी दुपारी ४ वा. विजपडुन मृत्यूमुखी पडले .
ते खादगांव ता नांदगांव चे रहिवाशी होते खादगांव येथे हि घटना घडली या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली .त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा वय दिड वर्षे,व ३ महिण्याची एक चुमकली असा परिवार आहे .
दुसर्या घटनेत दि ११ रोजी दुपारी ४० गांव रोडवर गंगाधरी येथे पार्किंग केलेल्या कारला दुचाकी स्वाराने पुढून जबर ठोस मारून स्वताच्या दुखापतीला स्वत:चा कारणीभूत ठरला तो गंभीर जखमी असल्याने त्यास बाहेरगांवी उपचारासाठी पाठविण्यात आले जखमी चे नाव पवन भगवान धोरण रा जगधने वाडा ता.नांदगांव. MH04/ DW/4837 हि वॅगनर कार गंगाधरी येथे रोडच्या कडेला उभी असताना दुचाकी स्वार नं MH17/AA 8268 हि दुचाकी उभ्या कारवर जोरात येऊन आदळली त्तयात दुचाकीवाला जबर जखमी झाला त्यास नांदगांव ग्रामीण रुग्नालायात उपचार देऊन पुढील उपचारासाठी बाहेरगांवी हलविले. घटनेची नांदगांव पोकीसात अपघातात नोंद झाली आहे.
तर गिरणाडँम. ता. नांदगांव येथे एक नराधमाने बहीनीवर अत्याचार केल्याची घटना नांदगांव पोलिसात गुन्हा नोंद झाली आहे.३७६ पोस्को प्रमाणे अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला म्हनुण ३७६,बाल लैंगिगता अत्याचार प्रमाणे गुन्हा दाखल आहे तपास पो नि प्रितम चौधरी करीत आहे .
0 Comments