होरायझन अकॅडमी, नांदगाव येथे विद्यार्थ्यांचे स्वागत

 Bay team aavaj marathi 


सिताराम पिंगळे प्रतिनिधी नांदगाव (नाशिक)


मराठा विद्या प्रसारक समाजाचे, होरायझन अकॅडमी, नांदगाव शाखेची सुरुवात दि (१०) उत्साहात झाली. या निमित्त विद्यार्थ्यांचे होरायझन अकॅडमीच्या वतीने स्वागत करण्यात आले. या वेळी विद्यार्थ्यांचे औक्षण करण्यात आले. प्रत्येक विद्यार्थी शाळेच्या गेटमध्ये आल्यावर प्राचार्या श्रीमती.पुनम डी मढे यांनी विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. 

या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले होते. यावेळी सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन न्यू इंग्लिश स्कूल, नांदगाव शाळेचे स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व्ही. वाय. काकळीज यांनी प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. तसेच कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय, नांदगाव महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एन शिंदे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत प्राचार्या श्रीमती. पुनम डी मढे यांनी केले. इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले. तसेच प्राचार्या श्रीमती मढे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. होरायझन अकॅडमी विषयी संपूर्ण माहिती प्रास्ताविक भाषणामध्ये सांगितली.विद्यार्थ्यांना गाणे, गोष्टी तसेच शालेय अभ्यासक्रमाविषयी माहिती दिली. 

या कार्यक्रमासाठी मविप्र समाज संस्थेचे नांदगाव तालुका संचालक इंजि. अमित भाऊ बोरसे-पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. सदर कार्यक्रम प्रसंगी तालुक्यातील मविप्र समाज संस्थेचे सभासद बांधव तसेच पत्रकार बांधव व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तसेच आभार प्रदर्शन श्रीमती.अनुराधा खांडेकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मेहनत घेतली.

Post a Comment

0 Comments