पंतप्रधानपदी श्री मोदी यांची तिसर्यांदा निवड झाल्याबद्दल आनंदोत्सव साजरा

 Bay team aavaj marathi 

मारुती जगधने जेष्ठ पत्रकार नांदगाव {नाशिक}

नांदगाव येथे शिवसेना आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या कार्यालयासमोर भारताच्या तिसर्यांदा पंतप्रधानपदी श्री नरेंद्रजी मोदी साहेबांची निवड झाल्या बद्दल जल्लोष साजरा करण्यात आला. 

यावेळी आतिषबाजी करून गुलालाची उधळण करण्यात आली . शिवसेनेचे शहर प्रमुख सुनील जाधव यांनी मनोगत व्यक्त करताना आमदार श्री सुहास अण्णा कांदे यांच्या वतीने श्री नरेंद्रजी मोदी साहेबांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 

याप्रसंगी युवा सेना तालुकाप्रमुख सागर भाऊ हिरे, नंदू पाटील राजाभाऊ देशमुख सुधीर देशमुख दीपक मोरे मुज्जू शेख शशीकांत सोनवणे महेंद्र गायकवाड मधुकर मोरे मनोज शर्मा शाम हिरे भरत पारक गौरव बोरसे गणेश हातेकर पवन झडगे चेतन मोरे विजय कंदीलकर आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments