नांदगांव येथे दत्तनगर मध्ये गटारी तुंबलेल्याने दुर्गंधी डासांच्या उत्पत्तीत वाढ

 Bay team aavaj marathi 

मारुती जगधने जेष्ठ पत्रकार नांदगाव (नाशिक)

नांदगांव शहरातील स्टेटबँकेच्या मागील भाग दत्तनगर मध्ये रस्ता काँक्रेटी करण झाले आता याच दत्तनगर मधील गटारीचे सांडपाणी पूर्वेकडील शेवटचे घर पगारे यांच्या घराला लागून मोठ्या खड्ड्यात परिसरातील मोठ्या प्रमाणात साचले असून त्यामुळे दुर्गंधी पसरली आहे.


 या बाबत सविस्तर वृत्त असे की येथील दत्त नगर मध्ये पगारे यांच्या रहाते घराजवळ परिसरातील सांडपाण्याच्या गटारीचे पाणी मोठ्या खड्ड्यात निचरा होत नसल्याने साचले असून काही उपाययोजना करुन रहिवाशांना दिलासा द्यावा अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

तसेच ठिकाणी रखडलेले भुयारी गटारीचे कांम पूर्ण करण्याची मागणी होत आहे येथील नागरी वस्तीला पूर्वेकडील रस्त्याला उतार असल्याने पाणी शेवटच्या घराजवळ तुंबते या तूबलेल्या पाण्याच्या डबक्यामुळे येथील रहिवाशी ञस्त झाले आहेत दुर्गंधीमुळे दिवसभर दार बंद करुन ठेवावे लागते. पावसाचे दिवस असल्याने नगर पालिका प्रशासनाने  या साचलेल्या पाण्यावर मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती वाढत असून संभाव्य रोगराईला आळा घालावा व तुडुंब भरलेल्या सांडपाण्याच्या गटारितील मैला काढून साचलेल्या पाण्याला वाट मोकळी करून द्यावी, अशी मागणी येथील रहिवाशांनी केली आहे .

Post a Comment

0 Comments