फळझाडे व पिकावरील अळीच्या प्राद्रुर्भाने शेतकरी ञस्त

 Bay- team aavaj marathi 

मारुती जगधने जेष्ठ पत्रकार नांदगाव (नाशिक)

पावसाळा सुरू झाल्यापासून ढगाळ वातावरण आणि जोरदार पाऊस होत नसल्याने सततच्या दूषित वातावरणामुळे फळ झाडावरील ओमणी अळीचा व पिकावरील लष्करी अळींचा व इतर किटकांच्या प्रादुर्भावची नांदगांव तालुक्यात एक गंभीर समस्या निर्माण झाली आहे,यामुळे झाडाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे व फळांचे उत्पादन घटते आहे. 

मागील हंगामात पाऊस न पडल्याने आनेक फळबागा उदध्वस्त झाल्या व खरीप पिकांची वाताहत झाली होती या खरीप हंगामात किटकांच्या व अळीच्या नियंत्रणासाठी अनेक उपाय करून शेतकरी बांधव हैराण झाले आहे.

तालुक्यात पावसाळ्यात पुरेसा धडाकेबाज पाऊस नसल्याने ओमणी व लष्करी अळीचा प्राद्रुर्भाव वाढला आहे सततचे दमट वातावरणामुळे अळीचे प्रमाण वाढत आहे मागील वर्षी दुष्काळाने होरपळेला शेतकरी या वर्षी पिकावरील रोगांच्या प्राद्रुर्भाने ञस्त झाला आहे. फळझाडा सोबत अळींनी मका, बाजरी, भुईमुंग,कडधान्ये, तलबिया आदींची पाने कुरतडली जात आहे .एकंदरीत पिकावरील व फळझाडावरील अळीचा प्राद्रुर्भावाने शेतकरी हैरान झाला आहे .पिके जोमात आसली तरी पिकावरील किटक व अळीच्या प्राद्रुर्भाने शेतकरी विविध प्रकारचे प्रयोग करून हतबल झाला आहे. जोपर्यंत दमदार पाऊस होत नाही तोपर्यंत अळीचा व इतर किटकांचा प्रादुर्भाव कमी होणार नाही..

कृषी तज्ञांच्या मते परिस्थिती नुसार खालील उपाय करून बघावे.

१) ओमणी अळीचे नैसर्गिक शत्रू जसे की परजीवी व तत्सम कीटकांचा वापर करावा.
 २) समतोल पिके घेणे, नियमित अंतराने पाणी देणे, व पिकाची वेळोवेळी निगराणी करणे.
३) नीम तेल, लिंबू अर्क यांसारखी जैविक कीटकनाशके वापरल्यावर ओमणी अळी नियंञणात येऊ शकते.
४) अत्यंत आवश्यक असताना फक्त परवाना प्राप्त व शिफारसीय रासायनिक कीटकनाशके वापरणे.
५)यासाठी फळमाशी सापळे किंवा प्रकाश सापळे वापरून ओमणी अळीचे संख्येत कमी करता येते.
 ६)नियमित फळे व पानांची तपासणी करून संक्रमित भाग वेगळे करणे व नष्ट करणे.

हे सर्व उपाय वापरल्यास ओमणी अळीचा प्रादुर्भाव कमी करण्यास मदत होईल.



 

Post a Comment

0 Comments