मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच सूर्य ओकतोय आग, होऊ शकतो उष्मा‘घात’

 Bay- team aavaj marathi 

नांदगाव तालुक्यातील पुर्व भागात घाटमाथ्यावर मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच सूर्य आग ओकण्यास सुरू झाला असून यावर्षी थोडा लवकरच कडाक्याचा उन्हाळा सुरू झाला आहे. या आठवड्यात उष्णतेचा पारा 34 अंश सेल्सिअस झाला असून, यापूर्वी 34-35 अंश सेल्सिअस तापमान हे ग्रामीण भागात एप्रिल महिन्याच्या शेवटी किंवा मे महिन्यात असायचे परंतु या वर्षी मार्च महिन्यात सरासरी दिड ते दोन महिने आगोदर उष्णतेमुळे अंगाची लाही लाही होण्यास सुरुवात झाली आहे.

सध्या तापमानाचा जोर वाढला असून, पारा 34 अंशापार गेला आहे. यापेक्षा अधिक तापमान वाढल्यास उष्माघात होण्याची शक्यता अधिक असते. मात्र, उष्माघात टाळण्यासाठी काही घरगुती उपाय प्रभावी ठरू शकतात. उष्माघाताची कारणे आणि लक्षणे देखील जाणून घेणे गरजेचे असून, खालील प्रमाणे घरगुती उपाय केल्यास उष्माघात टाळता येऊ शकतो. मात्र, अधिक त्रास झाल्यास डॉक्टरांना दाखवावे, असा सल्ला बोलठाण प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ स्वाती गोंड यांनी दिला आहे.

त्या पुढे म्हणाल्या की कडक उन्हात पूर्णपणे झाकून बाहेर न पडणे, कडक उन्हात अनवाणी चालणे, एसीची जागा सोडून लगेच उन्हात पोहोचणे, कमी पाणी पिणे, उन्हातून घरी आल्यावर लगेच थंड पाणी पिणे इत्यादी गोष्टींमुळे उष्माघात होण्याची शक्यता अधिक राहाते.

वारंवार तोंड कोरडे पडणे, धाप लागणे, उलट्या, चक्कर येणे, डोकेदुखी, उच्च ताप, हात आणि पाय सुन्न होणे, अशक्त वाटणे, जास्त थकवा जाणवणे इत्यादी उष्णा घाताची लक्षणे दिसतात.त्यावर डॉ स्वाती गोंड यांनी काही घरगुती उपाय सुचवितांना धणे व जिरे कोमट पाण्यात भिजवून ठेवा. ते फुगले की मॅश करून गाळून घ्या आणि थोडी साखर घालून प्या. उन्हाळी लागणे म्हणजे लघवी करताना जळजळ होणे कमी होते.नाकातून रक्त येणे लक्षण असल्यास दुर्वा रस पिण्यास द्यावा, असे सारखे झाल्यास डॉक्टरांना दाखवणे. दही, तळलेले पदार्थ, तिखट, मसाला पदार्थ टाळावेत.

उन्हाळ्यात डाळींब/कोकम/नारळपाणी/वाळा सारखे थंड सरबत तहान भागवण्यासाठी उपयुक्त असतात.कच्चा कांदाही उन्हापासून वाचवण्यात यशस्वी ठरतो. त्यामुळे कांद्याचे सेवन अधिक प्रमाणात करावे. सुती कपडे, गॉगल वापरणे. असे उष्णतेपासून वाचण्याचा व त्यावर घरगुती उपाय डॉ स्वाती गोंड यांनी सुचविला आहे.


Post a Comment

0 Comments