Bay- team aavaj marathi
सिताराम पिंगळे सर पत्रकार मांडवड नांदगाव (नाशिक)
मराठा विद्या प्रसारक समाज,नाशिक संचलित स्व. शरद अण्णा आहेर जनता विद्यालय, मांडवड येथे नाशिक लोकमत वृत्तपत्राच्या वतीने लोकनेता २०२५ हा पुरस्कार संस्थेचे संचालक तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती नांदगाव चे संचालक इंजि. अमित बोरसे- पाटील यांना मिळाल्याबद्दल त्यांचा विद्यालयात तर्फे सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजनाने करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी स्व.शरद अण्णा आहेर जनता विद्यालय, मांडवड विद्यालयाचे शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष प्रशांत आहेर हे होते. तर अतिथी म्हणून जेष्ठ नेते रमेश अण्णा बोरसे तसेच न्यू इंग्लिश स्कूल शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विजय काकळीज तसेच नांदगाव आय.टी. आय. शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील बोरसे उपस्थित होते.
कार्यक्रमाप्रसंगी प्रशांत आहेर व डॉ.प्रवीण निकम यांनी नांदगाव तालुक्याचे आमदार सुहास अण्णा कांदे यांच्याकडून विशेष निधी प्राप्त करून शाळेमधील काही गरजा पूर्ण करता येतील का? असा विचार मांडला यावर सत्कारमूर्ती इंजि.अमित बोरसे पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सर्व समाज घटकांनी एकत्र येऊन एकत्रित प्रयत्न करून आणि शाळेच्या विकासासाठी केव्हाही खंबीरपणे उभा आहे. असा विश्वास दिला व येत्या अडीच वर्षांमध्ये केलेल्या विविध विकासकामांविषयी माहिती दिली.
सदर कार्यक्रमासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक कवडे आर. आर. संस्थेचे सभासद रामराव मोहिते, कारभारी वडगुले , शिवाजी आहेर,माधव काजळे,दौलतराव आहेर,प्रकाशराव आहेर, बाळासाहेब आहेर, गंगाराम थेटे, तसेच दिलीप आहेर, अशोक निकम, महेंद्र आहेर, सागर आहेर,पिंगळे सर, अजित आहेर हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे उपशिक्षक हेमंत परदेशी यांनी केले. आभार प्रदर्शन ज्येष्ठ शिक्षक कवडे एस.एस. सर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर सेवक यांनी परिश्रम घेतले .
0 Comments