बोधगया येथे सुरू असलेल्या आंदोलनास जातेगावकरांचा पाठिंबा

 Bay- team aavaj marathi 

K.k महाले पत्रकार जातेगाव नांदगाव नाशिक 

बिहार राज्यातील बोधगया येथे बौद्ध भिकू संघाचे  सुरू असलेल्या आंदोलन आणि उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर आज दि. ९ रविवार रोजी त्या म्हणून जातेगाव येथे मोठ्या संख्येने बौद्ध उपासक व उपसीका यांनी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सर्वांनी बौद्ध विहारात बुद्ध वंदना घेऊन महाबोधी विहार येथे चालू आंदोलन असलेल्या आंदोलनाला पाठिंबा दिला तरी तेथील सरकारने योग्य तो निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली.

 देशाच्या बिहार राज्यामधील बोधगया एक ऐतिहासिक स्थान आहे. बिहारच्या गया जिल्ह्यात गया शहरापासून १५ कि.मी अंतरावर असलेल्या बोधगया येथील महाबोधी मंदिरासाठी जगप्रसिद्ध आहे. येथील बोधी वृक्षाखाली बसून भगवान गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली होती असे मानण्यात येते. बोधगया, कुशी नगर, लुंबिनी व सारनाथ ही बौद्ध धर्मातील चार सर्वात पवित्र तीर्थक्षेत्र आहेत.



Post a Comment

0 Comments