पोलीस अधिक्षक तेगबीर सिंह संदू यांच्या हस्ते पो.हवा. बस्ते यांना प्रशस्तीपत्र प्रधान

 Bay- team aavaj marathi 

नांदगाव पोलिस ठाणे अंतर्गत येणाऱ्या तालुक्यातील बोलठाण पोलिस आऊट पोस्ट हद्दीत असलेल्या सुमारे पंचवीस किलोमीटर अंतरावरातील १७ गावांमध्ये शांतता प्रस्थापित करण्यास यशस्वी झालेल्या पोलिस हवालदार भास्कर बस्ते यांना मालेगाव चे अप्पर पोलीस अधिक्षक श्री तेगबीर सिंह संदू यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र प्रधान करुन गौरवीण्यात आले.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, मा. मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी शासनाच्या विविध शासकीय विभागांना १०० दिवसांचा ७ कलमी निश्चित करणेबाबत सुचना दिल्या होत्या. त्यानुसार राज्यातील नागरिकांना त्यांच्या हक्काच्या सर्व शासकीय योजना मुलभूत सुविधा इत्यादी प्रदान करणे बाबत परिपत्रक काढले होते.त्याअनुषंगाने मालेगाव चे अप्पर पोलीस अधिक्षक श्री तेगबीर सिंह संदू (IPS) यांनी केलेल्या परिक्षण करुन मालेगाव अंतर्गत येणाऱ्या पोलिस ठाण्यातील हद्दीत शासनाने ठरवून दिलेल्या १०० दिवसाच्या कृती आराखड्यात एकाही गावात जातीय दंगल अथवा किरकोळ कारणावरून वाद होवू न देता.

 शांतता प्रस्थापित करण्यास यशस्वी ठरलेल्या नांदगाव तालुक्यातील बोलठाण पोलिस औटपोस्टचे पो. हवा. भास्कर रामा बस्ते बक्कल नं ४०८ यांना मालेगाव चे अप्पर पोलीस अधिक्षक श्री तेगबीर सिंह संदू (IPS) यांनी यांच्या हस्ते शनिवार दि ८ मार्च रोजी नांदगाव पोलिस ठाण्यात प्रशस्तीपत्र प्रधान केले. याप्रसंगी त्यांनी हवालदार बस्ते यांना मार्गदर्शन देखील केले.

 यावेळी मनमाड चे उपविभागीय पोलिस अधिकारी महाजन पोलीस निरीक्षक प्रितम चौधरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष बहाकर, सुनील बडे यांच्यासह पोलिस ठाण्यातील सर्व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments