विज वितरण च्या ठेकेदाराचा मनमानी कारभार रस्त्याला लागून उभे केले खांब उभे केलेले खांब देणार अपघातास निमंत्रण

 Bay- team aavaj marathi 

कायमस्वरूपी विज पुरवठा करण्यासाठी करण्यात आलेल्या सर्वेक्षणाला तिलांजली देऊन, विज वितरण च्या ठेकेदाराने सार्वजनिक बांधकाम विभागाची पुर्व परवानगी न घेता घाईगडबडीत काम उरकण्यासाठी रस्त्याच्या कडेला उभे केले विजेचे खांब करून ही मनमानी पद्धतीने खांब उभे करून काम सुरुच ठेवले आहे. त्यामुळे एका अर्थाने अपघातास निमंत्रण दिले जात आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथे बोलठाण रस्त्यालगत विज वितरण कंपनीचे ३३/११ केव्हीचे सबस्टेशन आहे. येथून ढेकू, कुसुमतेल, वसंत नगर १ व २, चंदनपुरी, लोढरे आणि गोंडेगाव या गावांतील वाणिज्य व घरगुती विज ग्राहकांना कायमस्वरूपी विज पुरवठा मिळावा म्हणून शासनाच्या निर्देशानुसार येथील विज वितरण कंपनीचे तत्कालीन कनिष्ठ अभियंता शशांक टोरपे यांनी सर्व्हेक्षण करून प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविला होता. त्यानुसार सिंगल फेज योजनेअंतर्गत वरील गावातील नागरिकांना कायमस्वरूपी विज पुरवठा मिळावा म्हणून या कामाला मंजूरी मिळाली.

हे मंजूरीसाठी पाठवलेल्या प्रस्तावानुसार होणे गरजेचे होते. परंतु हे काम घेतलेल्या ठेकेदाराने घाई गडबडीत काम उरकण्यासाठी मंजुरीसाठी पाठवलेल्या सर्वेक्षणातील तिलांजली देऊन ढेकू, कुसुमतेल, वसंत नगर १ व २, चंदनपुरी, लोढरे या गावांना विज पुरवठा करण्यासाठी अनेक ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य रस्त्यांच्या लागून सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी न घेता विजेचे खांब उभे केले. व त्यांना ठिकठिकाणी रस्त्याच्या बाजूने खांबाला तान दिले. तर काही ठिकाणी विज पुरवठा चालू बंद करण्यासाठीची यंत्रणा (A.b.switch) उभी केली.

घाटमाथ्यासाठी वरदान ठरणाऱ्या अमृत काल केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत मनेगाव फाटा ते वेहेळगाव पर्यंत जवळपास ६० किलोमीटर रस्त्याचे कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने मजबूत आणि सिमेंट काँक्रेट रस्त्यासाठी प्रस्ताव पाठविला आहे. हा पाठवलेला प्रस्ताव मंजूरीच्या प्रतिक्षेत असून भविष्यात हा रस्ता रुंदीकरण होणार असल्याने सध्या विज वितरण कंपनीचे उभे केले जात असलेले खांबाचा अडथळा निर्माण होवू शकतो. 

कन्नड तालुक्यातील औट्राम घाट कोर्टाच्या आदेशानुसार वाहतूकीसाठी बंद केल्याने दक्षिण उत्तर राज्यातील होणारी वाहतूक आणि बाजार समिती बोलठाण येथे येणारे शेतकरी वाहने यांची संख्या लक्षणीय असून दररोज सकाळी रहदारी ठप्प होते. त्यातच हा रस्ता अरुंद असून रस्त्याचे बाजूला उभे केलेल्या खांबांमुळे व खांबाला ठिकठिकाणी दिलेल्या ताण ste मुळे रहदारीस अडथळा निर्माण होवून अपघात होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे वरील गावांना विज पुरवठा करण्यासाठी करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार काम करण्यात यावे अशी मागणी होत आहे. त्याचप्रमाणे जातेगाव हुन गोंडेगांव ला जाणार्या जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या रस्त्याच्या कडेला देखील खांब उभे करून काम उरकण्याचे काम सुरू आहे. हे काम सुध्दा विना परवानगी सुरू असून, वीज वितरण कंपनीच्या ठेकेदाराचे सूरु असलेले मनमानी काम तत्काळ बंद करून सर्वेक्षणानुसार मंजुरी मिळालेल्या प्रमाणे काम करण्यात यावे अशी मागणी होत आहे.

 

Post a Comment

0 Comments