स्कूल बस मोटारसायकल अपघात एकाचा मृत्यू तर गंभीर जखमी चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचला विद्यार्थ्यांचा जीव

 Bay- team aavaj marathi 

 दि 22...

नांदगाव तालुक्यातील जातेगाव बोलठाण रस्त्यावर सोमवार दि 22 रोजी दुपारी 3 वाजेच्या दरम्यान बोलठाण येथील डायमंड इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या MH.20 TC-6468 या बसची आणि न्यायडोंगरी येथील MH.41 BU-4576 या शाईन  मोटारसायकलच्या झालेल्या अपघातात राकेश धोंडीराम खैरनार (वय २८) रा न्यायडोंगरी यांस डोक्याला गंभीर मार लागल्याने घटनास्थळी मृत्यू झाला. तर त्याच्या सोबत मोटारसायकल वर असलेल्या प्रकाश नारायण पवार (वय ५५) न्यायडोंगरी पायाला मार लागल्याने जखमी झाल्याने त्यांच्या वर बोलठाण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार करून अधिक उपचारासाठी नांदगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले असल्याचे येथील वैद्यकीय अधिकारी अनुराग पवार यांनी सांगितले.

स्कूल बसच्या चालकाच्या प्रसंगावधानामुळे रस्त्याच्या बाजूला 15 फुटखोल नाली मध्ये ही बस गेली असती तर  मोठा अनर्थ घडला असता. हा अपघात घडला त्यावेळी परिसरातील शेतातील नागरिकांनी धाव घेऊन या स्कूल बस मध्ये असलेल्या 50 विद्यार्थ्यांना गाडीच्या बाहेर काढले. त्यांना तत्काळ दुसऱ्या बसणे घरी पोहचविले असल्याची माहिती विद्यालयाच्या वतीने संचालक दिपक घुले त्यात सुदैवाने कोणीही विद्यार्थी जखमी नसल्याची त्यांनी दिली.

स्कूल बस चालकाचे नाव समजले नसून घटनेची माहिती मिळताच बोलठाण येथील पोलीस हवालदार भास्कर बस्ते आणि पोलीस नाईक परमेश्वर श्रीखंडे तात्काळ घटना- स्थळी जाऊन पंचनामा करून दोन्ही वाहने येथील पोलीस ऑफ पोस्ट च्या आवारात आणून उभे केले असून उशिरापर्यंत गुन्ह्याची नोंद करण्यात नव्हती.

परिसरातील शेतकरी व नागरिकांनी दिलेल्या माहिती नुसार या रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात काटेरी झुडपे उगवलेली असून त्यामुळे वळणाच्या ठिकाणी समोरुन येणारे वाहन दिसून येत नाही त्यामुळे तसेच ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने खड्डे चूकविण्याच्या नादात अपघाताचे प्रमाण वाढले असून आजही अपघात घडला त्याठिकाणी, खड्डा चुकविता अपघात घडला असावा असे सांगितले.

Post a Comment

0 Comments