Team --aavaj marathi
नांदगाव तालुक्यातील न्यायडोंगरी (गवळीवाडा) ग्रामस्थांच्या मागणीनुसार येथील श्री.महादेव मंदिर प्रांगणात आ.सुहासअण्णा कांदे यांच्या आमदार निधी अंतर्गत १५ लक्ष रुपये सामाजिक सभागृहाच्या कामासाठी मंजूर करण्यात आले असून, या कामाचे भुमी पुजन शनिवार दि.१० फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या प्रसंगी गवळीवाडा येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी पंचायत समितीचे माजी सभापती विलास भाऊ आहेर, किरण आण्णा कांदे, संजय आहेर, पप्पू आहेर, जालम पाटील, तेज आहेर, दीपक मोरे, राजू तिळवणे, गणेश आहेर, भावराव बागुल, सागर हिरे, शशी सोनवणे, प्रकाश शिंदे,नवनाथ सोमवंशी आण्णा लगडे,
दत्तू लगडे, संतोष हुंचे, शिरू निस्ताने, भावडू निस्ताने, भावडू औषिकर, शिदू औषिकर, दत्तू नामदे, शिदू लगडे, मोहन लगडे, धना संभाजी जामदे, ईश्वर लगडे, योगेश निस्ताने आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments