Team --aavaj marathi
नांदगाव तालुक्यातील लोक संखेने सर्वात मोठे असलेल्या साकोरा येथे जलजीवन योजने अंतर्गत गिरणा धरणातून पाणी पुरवठा योजना पूर्ण झाले, मात्र ग्रामपालिकेकडे विद्युत वितरण कंपनीचे मागील विज बिलाची थकबाकी असल्याने वीजपुरवठा मिळत नव्हता आ. सुहास अण्णा कांदे यांच्या मध्यस्थीने विज पुरवठ्याचा मार्ग मोकळा झाला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,सु मारे पाच कोटी रुपयांची जल जीवन योजने अंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या योजनेचे काम पूर्ण झाले असतांनाही ग्रामस्थांवर पाणी टंचाईचे संकट आ वासून उभे राहिले होते. संतापातून येथील ग्रामस्थ, महिला, यांनी पाणी टंचाई विरोधात ग्रामपालिका कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले होते. या बाबत आमदार सुहास कांदे यांच्याकडे माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश बोरसे आणि ग्रामपालिका पदाधिकारी व ग्रामस्थांनी कैफियत मांडली होती. दुष्काळाचे सावट आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई याचे गांभीर्य लक्षात घेऊन आ.कांदे यांनी वीज वितरण कंपनीचे सहायक अभियंता डी. वाय.वाटपाडे यांची बैठक घेऊन पाणी टंचाईची सदयस्थिती विषद केली.
विज वितरण कंपनी आणि आर्थिक अडचणीत असलेली स्थानिक स्वराज्य संस्था यांच्यात मध्यम तोडगा काढत आ.कांदे यांनी ग्रामपालिकेने विज वितरण कंपनीची विजेची थकबाकी हप्ते करून भरून द्यावी व विज कंपनीस सहकार्य करावे, असे आवाहन केल्यानंतर ग्रामपालिका प्रशासन तयार झाल्याने. नवीन पाणी योजनेसाठी वीज वितरण कंपनीने वीज पुरवठा देण्याचे मान्य केले.व तसे मंजुरीचे पत्र ही दिल्याने वीजपुरवठा मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याने साकोरा ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले व पाणी बाणी समस्येला पुर्णविराम मिळाला व पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याने ग्रामस्थांनी आ.कांदे यांचे आभार मानले आहेत.
0 Comments