नाशिक जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीचे सिन्नर तालुका अध्यक्ष प्रवीण भाऊ जाधव यांच्या अध्यक्षतेखाली सिन्नर तालुका निरीक्षक राहुलजी पटेकर यांनी संघटनेच्या वंचित बहुजन युवा आघाडी साठी कार्यकर्त्यांच्या विविध पदांवर नियुक्ती करणे यासाठी मुलाखती घेतल्या लवकरच वंचित बहुजन युवा आघाडीची सिन्नर तालुक्याची कार्यकारणीची घोषणा करण्यात येईल
कार्यकर्त्यांचा उत्साह बघता लवकरात लवकर योग्य व निस्वार्थ काम करणाऱ्या संघटनेच्या पदाधिकारी निवड करण्यात येईल असे यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना आश्वासन दिले. व येत्या काही दिवसांत निवडणूकांचे वारे वाहू लागणार आहे तरी सर्वांनी एकजुटीने आणि निष्ठेने वरिष्ठांचे आदेश पाळून वंचित बहूजन आघाडीचे सर्व्हेसर्वा ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांचे हात बळकट करायचे आहे, असे त्यांनी सांगितले व शुभेच्छा देत कामाला लागण्याच्या सुचना दिल्या.
या प्रसंगी नाशिकचे वंचित बहुजन आघाडीचे राजाभाऊ गोतीस , भगवान तालखे, संतोषभाऊ शिराळ, वंचित बहुजन आघाडीचे नाशिक जिल्हाउपाध्यक्ष नानाजी पवार शिंदे साहेब किरणभाऊ भोळे संदीप गवारे अमोल मोकळ कपिल कापुरे सचिन जगताप राहुल जारे सतीश साबळे गोरख गोरे सुरज जगताप सोनू पवार विशाल रामराजे जीवन दोंदे महेश कांबळे एकनाथ गायकवाड गोपी वाघचौरे संजू पवार तुकाराम जगताप मोठ्या संख्येने सिन्नर तालुक्यातील कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते व आलेल्या सर्वांचे आभार सिन्नर तालुका निरीक्षक राहुलजी पटेकर यांनी मानले.
0 Comments