नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज शिवराज्याभिषेक महिला मंडळ आणि शिवछत्रपती तरुण मित्र मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
या निमित्ताने येथील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या प्रशस्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या परिसरात सर्व स्वच्छता करून महिला मंडळाच्या वतीने आकर्षक रांगोळ्या काढून पुतळ्याच्या स्तंभाच्या ठिकाणी आकर्षक कापडी आणि प्लास्टिकच्या फुलांची सजावट करण्यात आली होती. सकाळी छत्रपती शिवाजी
महाराज यांची महिलांच्या हस्ते आरती करून औक्षण केले. उत्सव समितीच्या आणि ग्रामपालिकेच्या पदाधिकार्यांनी पुतळ्याचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून श्रीफळ वाढविण्यात आले. त्यानंतर ९ वाजता मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या जनता माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी व आदर्श शिशुविहारच्या चिमुकल्यांनी पोवाडे गायले व नृत्य सादर केले. त्यांना उत्सव समितीच्या वतीने प्रोत्साहन पर बक्षीस वितरण करण्यात आले. हा सांस्कृतिक कार्यक्रम दोन तास सुरू होता.
शिवजन्मोत्सव आणि मिरणूकीतील निवडक क्षण बघण्यासाठी खालील लिंकला टच करा
दिवसभर नागरिकांनी महाराजांच्या फोटोचे पुजन करुन दर्शन घेतले. सायंकाळी ५ वाजता महिला कार्यकर्त्यांनी भगवे फेटे बांधून मिरणूकीत सहभागी झाल्या याप्रसंगी जय जिजाऊ जय शिवराय, जय भवानी जय शिवाजी, हर हर महादेव घोषणा देत प्रचंड आतिषबाजी करत पारंपरिक बँड पथकावर गावातील प्रमुख मार्गावरून महाराजांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. याप्रसंगी गावातील पुरुषांच्या तुलनेत मिरवणूक जसजशी पुढे जावू लागली तशी महिलांची संख्या लक्षणीय वाढत गेली.ठिकठिकाणी महिलांनी महाराजांच्या प्रतिमेचे औक्षण केले, मिरवणुकिची ९ वाजता सांगता झाल्यानंतर पुन्हा एकदा आरती करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. वरील कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिवजन्मोत्सव समितीच्या आणि शिवराज्याभिषेक महिला मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
0 Comments