डाॅक्टरवाडी, बाभुळवाडी येथे गरजू लाभार्थ्यांना डावलून अनेकांना डबल लाभ

 Bay-- team aavaj marathi 

मारुती जगधने पत्रकार (नांदगांव)

विहिर व घरकुल मंजूर करताना मुख्य गरजू व गरीब लाभार्थींना डावलून,या पूर्वी लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांना डबल लाभ देण्यासाठी यादीत पुन्हा घेण्यात आले असून.त्यामुळे घरकुल वयक्तिक रोहयो विहीर योजनेत बोगस लाभार्थींचा समावेश करण्यात आला असल्याचा आरोप सामजिक कार्यकर्ते संजय मेंधे पाटील यांनी केला.



 त्यांनी तहसीलदार व गटविकास अधिकारी नांदगांव यांना त्या स्वरुपाचे निवेदन सादर केले असून या संदर्भातील गरजू व बोगस लाभार्थी यांची सखोल चौकशी करुन गरजू व मुळ लाभार्थींना न्याय देण्याची मागणी केली आहे तसेच गावांसाठी राबविलेल्या पाणी योजनेचा गावाला व नागरीकाना पाण्याचा लाभ मिळत नाही त्यामुळे नागरिकांना महिलांना पाण्यासाठी विहिरीतून शेंदुन पाणी आणावे लागत आहे. 


विहीर योजनेची देखील चौकशी करण्याची मागणी मेंधे पाटील यांनी केली आहे गावठाण च्या विहिरीला पाणी असताना ते पाणी गावातील नागरिकांना मिळत नसुन त्या पाण्याचा खाजगी वापर होत असल्याचे तक्रारीत म्हटले .

Post a Comment

0 Comments