या संस्थेची खजिना घेऊन पळालेल्या खजिनदारास पोलिसांनी काही तासांतच केले जेरबंद केले

 Bay team aavaj marathi 

मारुती जगधने पत्रकार {नांदगाव}

नांदगांव येथील लक्ष्मीनगर येथे कार्यरत असलेल्या क्रेडीट एक्सेस ग्रामीण लिमिटेड च्या कॅाशियरने भरणा करण्यासाठी आलेलि रक्कम न भरता परस्पर पळविल्याने नांदगांव पोलिसांनी काही तासात जळगाव जिल्ह्यातील चोपडा तेथे अटक करुन त्याच्या जवळून रोख रक्कम हस्तगत केल्याने पोलीसांच्या कामगिरीचे सर्वञ कौतुक होत आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, नांदगांव येथील क्रेडीट एक्सेस ग्रामीण लिमिटेड नांदगांव येथील कार्यालयात कॅशियर पदावर असलेल्या कॅशियरने ग्राहकांचे जमा झालेले पैसे ११ लाख ७७ हजार रुपये बँकेत न भरता सरदची रक्कम घेऊन पसार झाला होता त्यास नांदगांव पोलिसांनी १२  तासात पकडून अटक केली, या घटनेने बँकेच्या गोटात खळबळ उडाली आहे.

या संदर्भात नांदगाव पोलीस विभागाकडून मिळालेल्या माहिती वरुन फिर्यादी प्रवीण अशोकराव खंदार ता.नांदगांव यांचे फिर्यादीवरुन गु र नं १५०/२४ कलम ४०९, ४२० प्रमाणे गुन्हा दाखल यातील फिर्यादीवरुन संशयीत आरोपी उमेश नायायन देशमुख रा.आडावद ता. चोपडा (जळगांव) हा क्रेडीट एक्सेस ग्रा..लि.नांदगाव येथील कार्यालयात काम करीत असताना ३ एप्रिल रोजी नांदगांव कार्यालयात जमा  केलेले ११, लाख ७७ हजार, ७५ रुपये हे सदर बँकेत भरणा करणे आवश्यक असताना ते पैसे बँकेत न भरता अप्रामाणीक पणे स्वत:  च्या  फायद्या करता घेऊन पळून गेला, या संदर्भातील तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

या कामी पोलीस अधिक्षक विक्रम देशमाने, अप्पर पोलीस अधिक्ष अनिकेत भारती ,पोलिस उप अधिक्षक बाजीराव महाजन, पो नि प्रितम चौधरी,यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संदीप बडे, पो. उ. नि. मनोज वाघमारे, पो. ह. विनायक वाघ, भारत कांदळकर, अलगट, अनिल शेरेकर, पो. काॅ. दत्तु सोनवने, यांनी सापळा रचून संशयीतास २४ तासात चॊपडा येथे ताब्यात घेत अटक करुन त्याकडून संपुर्ण रक्कम हस्तगत केली, नांदगांव येथे आणले. येथील लक्ष्मीनगर येथे या संस्थेचे कार्यालय असून, संशयीताने सदर रक्कम का पळविली याबाबत काही कारण पुढे आलेले नसून, वरील घटनेचा अधिक तपास नांदगांव पोलीस घेत आहे .

Post a Comment

0 Comments