दुर्मिळ वन्य जीव व वनस्पती तस्कर वन विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत, या बाबत सविस्तर वृत्त असे की, हातजोडी पाय पडी हि बाहुलीच्या आकाराची वस्तु वन्यप्राण्यांच्या गुप्तांगापासुन बनवुन ते उन्हात वाळून त्याला छोट्या बाहुलीचा आकार देऊन त्या वस्तु बुवा बाबांना किंवा अंधश्रध्दाळू व्यक्तीना विकल्या जातात हातजोडी पायपडू हि बाहुली घरात राहिल्यावर दु:ख दारीद्र्येनष्ट होते. व्यवसायात भरभराटी, बरकता येणे, लग्न जमने या सारख्या आनेक काल्पनिक बाबींसाठी या बाहुलीचा अंधश्रध्दाळू लोक उपयोग करतात. धार्मीक स्थळावर भोदूबाबा याचा वापर करता या संदर्भातील निर्मितीसाठी वन्यप्राण्याच्या किंवा समुद्र जीवांची कत्तल करुन ते अवयव मिळवून त्याचा उपयोग संशयीत करीत असतात, यात नागमणी, आदिंचा हि समावेश असू शकतो अशाच प्रकारच्या अवयवांची तस्करी होत असल्याचे वनविभागाला गुप्त माहिती मिळाली.
त्याआधारे नांदगांव येथे वन्यजीव प्राण्याची तस्करी करण्याचा प्रकार वनविभागाने उघडकिस आणला असून यात वन्यजिवांचे कत्तल केलेले ३० लाख रूपये किंमतीचे अवयव जप्त करण्यात आले या मोठ्या कामगिरीने वनविभागाचे वन्यजिवप्रेमींनी स्वागत केले.
यात वनविभागाला घोरपडीचे शारीरिक लिंग ७८१ अवयव समु्द्रजिव इंद्रजाल आदी प्राण्याचा समावेश आहे. या बाबत वनविभागाकडुन मिळालेल्या माहितीवरून सविस्तर असे की वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी निखिल सावंत, उपसंचालक अशोक चक्रवर्ती, उमेश वावरे, अक्षय म्हेञे,एस एस ढोले, विनोद जगावे, विष्णु राठोड, सुरेंद्र शिरसाठ, नवनाथ बिन्नर अमोल पाटील, संजय बेडवाल, अमोल पवार, रवींद्र शिंदे पंकज नागपुरे यांनी नांदगांव येवला येथील वनाधिकारी वनपाल व कर्मचारी यांचा ताफा सोबत घेत थेट सस्वलदरा गाठले तेथे संशयीत आरोपी आदेश खञी पवार याला ताब्यात घेतले.
त्याच्या जवळ वन्यप्राणी घोरपड,व समुद्र जीव इंद्रजाल आदीचे लिंग ३० लाख रूपये किंमतीचे वन्यप्राण्यांचे लिंगाचे मास (गु्प्त अंग) हे ताब्यात घेतले हे अवयव हातजोडी पाय जोडी म्हणून( बाहुलीच्या आकाराचे)७८१ नग इंद्रजाल १९.५४८ किलो वजनाच्या वन्यप्राण्याच्या मुद्देमालासह मिळून आला. संशयीतांच्या विरोधात व .जि अधिनियम १९७२ ,९,३९,४०,४८ ए ४९,बी ५०,५१ प्रमाणे नांदगांव कार्यक्षेञ अंतर्गत गुन्हा दाखल असून सदर संशयीत आरोपीस अटक करुन दुसर्या संशयीताचा वनविभाग शोध घेत आहे. माञ वन्यजीव असंख्य घोरपडी व इंद्रजाल यांची शिकार कुठे कशी आणी कुणाच्या मदतीने झाली. यासंदर्भार्तील मुख्य माहिती आजुन वनविभागाच्या हाती लागली नाही, त्यामुळे ते शोधने वनविभागाला आव्हाण म्हणावे?
0 Comments