नांदगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार सुहास कांदे यांनी आज नगरवासियांचे ग्रामदैवत असलेल्या एकविरा मातेची यात्रा निमित्त एकवीरा देवीचे दर्शन घेत आरती केली.
यंदा मतदार संघात चांगला पाऊस पडू दे,व माझ्या तालुक्यावर असलेले दृष्काळाचे सावट दूर होवू दे शेतकरी बांधवांना भरभरून उत्पन्न होवू दे, पिण्याच्या पाण्याची समस्या दूर होवू दे असे देवी मातेला साकडे घातले.
आ. कांदे यांच्या सोबत यावेळी माजी नगराध्यक्ष राजेश कवडे, माजी सभापती विलास आहेर,उद्योजक आनंद कासलीवाल, बाजार समिती संचालक अमोल नावंदर, मजूर संस्थेचे संचालक प्रमोद भाबड, युवा सेनेचे तालुकाप्रमुख सागर हिरे, प्रकाश शिंदे, शहरप्रमुख सुनील जाधव,नंदू पाटील, पिंटू कासार, संदीप आहेर, संभाजी पाटील, मुन्ना शर्मा सर, यांच्या सह भाविक आणि स्थानिक व पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments