मोरे परिवारास आ. कांदेंनी दिला माणुसकीचा आधार

 Bay team aavaj marathi 

मारुती जगधने पत्रकार नांदगाव {नाशिक}

नांदगाव विधानसभा मतदार संघाचे आ. सुहास आण्णा कांदे यांनी पिंपरखेड येथील अपादग्रस्त कुटुंबाला धान्य, कपडे, भांडे आदी संसारपयोगी साहित्या देत माणुसकीचा आधार देऊन सामाजिक कृतज्ञता जपली आहे. 

पिंपरखेड येथील शंकर मोरे व अर्जुन मोरे यांच्या राहत्या झापाला शॉर्ट सर्किटने आग लागून संसारपयोगी साहित्य मग त्यात धान्य,सर्व वापरात असलेली भांडी, कपडे, आदीसह शेती साहित्य व काही कोंबड्या जळून खाक झाल्याने त्यांचा संसार अक्षरशः उघड्यावर आला होता.

याबाबत बाजार समितीचे संचालक जीवन गरुड,सामजिक कार्यकर्ते नवनाथ सोमवंशी व संदीप मवाळ यांनी तालुक्याचे आ सुहास अण्णा कांदे यांना कळवले असता, आ. कांदे यांनी लगोलग शंकर मोरे व अर्जुन मोरे यांच्या परिवारास 

नांदगाव बंगल्यावर बोलावून घेतले या कुटूंबाची आस्थेवाईक पणे चौकशी करून त्यांना ५० किलो गहू, ५० किलो तांदूळ, रोजच्या वापरासाठी लागणारी आवश्यक ती स्टील ची भांडी,कपडे, देवून त्या कुटूंबाला आधार दिला. 



तसेच आम्ही तुमच्या सोबत असल्याचा दिलासा दिला. या मदतीबाबत सदर मोरे कुटूंबाने सुहास आण्णा  यांचे आभार मानत कृतज्ञता व्यक्त केली. याप्रसंगी किरण आण्णा कांदे, सागर भाऊ हिरे, प्रकाश भाऊ शिंदे, बाजार समितीचे उपसभापती दिपक भाऊ मोरे, प्रमोद भाऊ भाबड, अमोल शेठ नावंदर, आण्णा मुंढे, रमेश काकाळीज, आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments