नाशिक जिल्ह्यातील नांदगांव तालुक्यातील जामधरी येथील आदीवासी बांधवांना स्वातंञ्ये मिळुन ७५ वर्ष झाले तरी आदीवासी बांधवांच्या वस्तीवर रस्ते, वीज, पाणी, आदी सुविधा मिळालेल्या नाही. असी मागणी करण्यात आली असून. तसेच आदीवासी नागरीकाना रेशन, जातीचे दाखले अन्य महत्वाची कागदपञे अद्याप मिळालेली नसल्याने येथील नागरिकांनी होवू घातलेल्या लोकसभा निवडणूकीत मतदान न करण्याचा निर्णय घेतला असून मतदानावर बहिष्कार टाकला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, वरील मुलभूत सुविधा नसल्याने या संदर्भात नांदगांव तहसिलवर सामाजिक कार्यकर्ते शेखर पगार यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढून मागण्याचे निवेदनावर तहसीलदार यांना देण्यात आले आहे. या वेळी शेकडोच्या संख्येने आदिवासी बांधव यात सामील झाले होते.
परंतु वरील पैकी कुठल्याही प्रकारच्या मुलभूत सुविधांचे कामे शासकीय किंवा ग्रामपंचायत स्तरावरुन सुरू करण्यात आले नाही. त्याचप्रमाणे वयक्तीक सुविधांसाठी शासकीय कागदपत्रे मिळालेले नाही त्यामुळे येथील नागरिकांनी होवू घातलेल्या लोकसभा निवडणूकीसाठी खासदार आमदार किंवा कुठल्याही लोकप्रतिनिधींनी येथे मतदान मागण्यासाठी येवू नये असा फलक लावण्यात आला असून नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे.
वारंवार मागणी करूनही त्याचप्रमाणे मोर्चा काढून शासनास आणि लोकप्रतिनिधींना जागे करण्याचा प्रयत्न केला, तरी झोपेचे सोंग घेतलेल्या लोकप्रतिनिधींना जाग आली नाही. व तालुक्यातील शासकीय कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभारस काही फरक पडला नसल्याने गेल्या कित्येक वर्षापासून मूलभूत सुविधा पासून वंचित असलेल्या येथील आदीवासी बांधवांनी
२० मे रोजी असलेल्या दिंडोरी लोकसभेसाठी होणाऱ्या लोकसभा निवडनुकीवर बहिष्कार टाकला असून येथे कोणी ही आमदार खासदार लोकप्रतिनिधीं यांनी मतदान मागण्यासाठी येऊ नये असे जाहीर फलक लावण्यात आला आहे, तसा सोशल मीडियावर देखील मेसेज व्हायरल होत आहे.
0 Comments