अखेर बंदची कोंडी फोडण्यास बाजार समितीला यश

 Bay team aavaj marathi 


नांदगाव बाजार समितीचे बोलठाण उपबाजार आवारावर प्रचलित कायदेशीर पद्धतीने हमाल तोलाई कपात करून कांदा लिलावाचे कामकाज सुरू झाल्याने जिल्हा व्यापारी असोसिएशन यांनी पुकारलेल्या बंदची कोंडी फोडण्यास नांदगाव बाजार बाजार समितीला यश मिळाले असून लिलावाचे कामकाज सुरू झाल्याने शेतकरी वर्गाने समाधान व्यक्त केले आहे. 

लेव्हीच्या मुद्द्यावरून नाशिक जिल्हा व्यापारी असोसिएशन हमाली तोलाई शेतकरी वर्गाकडून कपात करणार नाही अशी भूमिका घेऊन गेल्या एक महिन्यापासून बाजार समिती बंद आहेत. त्यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या आर्थिक अडचणीत सापडलेला होता. नांदगाव विधानसभेचे आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळाची सभापती अर्जुन पाटील यांच्या उपस्थिती मध्ये बैठक होऊन व्यापारी वर्गाने लिलावात सहभागी व्हावे अन्यथा परवाने निलंबित करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार बाजार समिती प्रशासनाने दोन नोटिसा व्यापारी वर्गाला दिलेल्या आहेत व नवीन व्यापारी परवाने देण्यास सुरुवात करून बोलठाण उपबाजारावर नवीन 23 परवाने देण्यात आले. 

सर्व संचालक मंडळाच्या उपस्थितीमध्ये बोलठाण मार्केट यार्ड लिलावाचे कामकाज पार पडले. यावेळी बाजार समितीचे सचिव अमोल खैरनार यांनी हमाली तोलाई ही बाजार समिती कायद्याप्रमाणे कपात केली जाते यात कोणतेही बेकायदेशीर काम केले जात नाही अशी भूमिका शेतकरी वर्गास समजून सांगितल्याने शेतकरी वर्गाने उस्फूर्तपणे लिलाव सुरू करण्यास सांगून लिलावाचे कामकाज पोलीस बंदोबस्तात पार पडले. यार्डात 80 वाहनांचा लिलाव होऊन कमीत कमी 300 जास्तीत जास्त 1551 व सरासरी 1240 असे बाजार भाव निघाले. नांदगाव यार्ड वर सुध्दा नवीन 14 परवाने देण्यात आले असून पुरेशी व्यापारी वर्ग उपलब्ध झालेवर नांदगाव यार्डवरही लवकरच लिलावाचे कामकाज सुरू करण्यात येईल अशी माहिती सचिव अमोल खैरनार यांनी यावेळी दिली.

बोलठाण उप बाजार समितीमध्ये कांदा लिलावास सुरुवात व्हिडिओ बघण्यासाठी खालील लिंक ला टच करा 

https://youtu.be/YzQJXTF9lb8?si=UmNkxydguSeGbTKD

    लिलावाचे वेळी सभापती अर्जुन पाटील उपसभापती दीपक मोरे, समाधान पाटील, सतीश बोरसे, अनिल सोनवणे कैलास पाटील, अनिल वाघ, जीवन गरुड , हमाल मापारी संचालक निलेश ईपर , सचिव अमोल खैरनार आदि सह नवीन व्यापारी असोशियन अध्यक्ष मनोज रिंढे , सर्व शेतकरी बांधव व्यापारी वर्ग, कर्मचारी वर्ग आदी उपस्थित होते. नांदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांनी सहकाऱ्या सह लिलावाच्या ठिकाणी भेट देऊन कायदा व सुव्यवस्थेची पाहणी केली.

 प्रतिक्रिया - बोलठाण मार्केट यार्ड लिलावानंतर कार्यालयामध्ये शेतमाल विक्रीची रक्कम रोख स्वरूपात शेतकरी वर्गाने घ्यावी. कोणीही उधार शेतमाल देऊ नये. पेमेंट बाबत तक्रार असल्यास कार्यालयात तात्काळ संपर्क साधावा. - अमोल खैरनार , सचिव 


 बाजार समितीने बोलठाण मार्केट यार्ड लिलावाचे कामकाज शेतकरी वर्ग समाधानी असून व्यापारी व माथाडी कामगार यांच्या भांडणात शेतकरी भरडला जात होता. नांदगाव बाजार समितीने योग्य तो कठोर निर्णय घेऊन नवीन व्यापारी परवाने देऊन शेतकरी हिताचा निर्णय घेतल्याने ते अभिनंदनास पात्र आहेत. - भाऊसाहेब रवळे, शेतकरी जातेगाव

Post a Comment

0 Comments