जळगाव बुद्रुक येथे नवनिर्वाचित सरपंच पदी सौ सुवर्णा योगेश सांगळे यांची वर्णी लागली. यावेळी आ. सुहास आण्णा कांदे यांनी उपस्थित राहून त्यांचा सत्कार केला तसेच पुढील वाटचालीस त्यांनी शुभेच्छा दिल्या. तसेच कार्यक्रमानंतर ग्रामस्थांसोबत एकत्र भोजनाचा आस्वाद घेतला.
कार्यक्रमप्रसंगी आमदार सुहास आण्णा कांदे यांनी उपस्थितांना संबोधित केले, जळगाव बुद्रुक गावावर माझे विशेष प्रेम आहे याचे कारण म्हणजे या गावात राजकारण, शेती, भाऊबंदकी काहीही असो पण माझ्या निवडणुकीचा विषय येतो तेव्हा मात्र सर्व गाव जसे देवासाठी मंदिरात एकत्र येतात तसे एकत्र येऊन मला मदत करतात हे मी कधीही विसरू शकत नाही आणि म्हणून जळगाव बुद्रुक या गावावर माझं विशेष प्रेम आहे असं प्रांजळ मत यावेळी व्यक्त केले. या गावात पाणी आरोग्य शिक्षण या सर्व सुख सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे आणि लवकरच एक वीज रोहित्र आणि प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करून अनिल असे आश्वासनही यावेळी त्यांनी दिले.
सुवर्णाताई यांच्या रूपाने सांगळे कुटुंबियांचे अनेक वर्षांचे स्वप्न आज पूर्ण झाले याचा मलाही आनंद होत आहे असेही त्यांनी सांगितले. व्यासपीठावर किरण आण्णा कांदे,मजूर संघाचे संचालक प्रमोद भाबड, बाजार समिती संचालक अमोल भाऊ नावंदर , माजी नगराध्यक्ष रामनिवास काका कलंत्री किरण भाऊ देवरे यज्ञेश कलंत्री, नवनियुक्त सरपंच सुवर्णा योगेश सांगळे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक नवनाथ भाऊ गीते यांनी केले.
सांगळे कुटुंबियांच्या वतीने नवनियुक्त सरपंच सुवर्णा सांगळे यांनी आमदार सुहास आण्णा कांदे यांचा सत्कार केला. याप्रसंगी पत्रकार संतोष कांदे, उपसरपंच पुंजाराम पथे, सदस्य विश्वनाथ कांदे, सौ.लंका शरद गीते, चिंधा गावंडे, उषा शरद आव्हाड, कृष्णा अहिरे, गोपाबाई नाना गावंडे, समस्त ग्रामस्थ महिला तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments